l नमस्कार l
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका बेडकाने तोंडात साप (बेडूक आणि साप व्हायरल व्हिडिओ) धरला आहे. साप सुद्धा स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करतो पण अपयशी ठरतो. व्हायरल झालेला व्हिडिओ मध्य प्रदेशातील शिवपुरी शहराच्या मध्यभागी असलेल्या न्यू शिव कॉलनीचा आहे.
तुम्ही अनेकदा सापांना छोट्या प्राण्यांची शिकार करताना पाहिलं असेल. ज्यामध्ये साप उंदीर आणि बेडकांची सर्वाधिक शिकार साप करतात. पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये काही औरच दिसून आलेले आहे. वास्तविक, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक बेडूक सापाची शिकार करताना दिसत आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप शेअर केला जात आहे. यासोबतच लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आणि खूप लाईक्स ही देत आहेत.”शिकारीच बनला शिकारी” मध्य प्रदेशातील शिवपुरीमध्ये बेडकाने केली सापाची शिकार .बेडकाने जिवंत सापाचा घेतला घास. बेडूक एका जाड, लांब सापावर चालत होता.
प्राण्यांची सामग्री ही इंटरनेटवरील सर्वाधिक पसंतीची सामग्री आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. त्यामुळेच प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत.काही महिन्यांपूर्वीही साप आणि बेडकाचा एक भयानक व्हिडिओ पाहण्यात आला होता. ज्यात एक बेडूक जाड, लांब सापावर बिनदिक्कत चालताना दिसत होता.
निर्भय बेडूक :- त्या व्हिडीओमध्ये हा बेडूक बेधडकपणे सापावर सरकताना पाहून असे वाटले की त्याला ना कोणाची भीती वाटत आहे आणि ना त्याला जीवनाची काही आशा आहे.
शिकारी खुद बन गया शिकार… मध्य प्रदेश के शिवपुरी में मेंढक ने किया सांप का शिकार.. #hunting #snakes #Frog pic.twitter.com/MmGYPRmn2j
— Nitesh Ojha (@niteshojha786) September 4, 2021
हा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांना आश्चर्यचकीत करत होता. हा व्हिडिओ नितेश ओझा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.