‘शांताबाई’ या गाण्यावरील या आजीच्या डान्सचा जब्बरदस्त विडिओ होत आहे वायरल , बघा विडिओ

। नमस्कार ।

सोशल मीडियावर हल्ली खूप प्रकारचे विडिओ वायरल झालेले पाहायला मिळतात. प्राण्यांचे , लहान मुलांचे cute विडिओ वायरल होतच असतात. तसाच आजचा हा विडिओ त्यावरच आधारित आहे पण तो विडिओ आहे एका आजीचा. तेव्हा चला मग जाणून घेऊयात त्या डान्सच्या व्हिडियोबद्दल.

हा एक आजींचा डान्सचा व्हिडियो आहे. कोणाच्याही घरात ज्या ज्या आजी असतात त्यांची डान्स करण्याची एक आगळी वेगळीच पद्धत असते. बऱ्याच वेळा तर त्या डान्स करताना आपल्याला दिसत नाहीत. पण जेव्हा त्या नाचायला लागतात तेव्हा तर मनापासून मनसोक्त नाचतात. या व्हिडियोमध्ये पण एक आजी मात्र एकदम बिनधास्त नाचताना दिसत आहे. या आजींसोबत बाकीच्या स्त्रियाही नाच करत असतात.

पण त्या अधून मधून ये जा करत असतात. कदाचित चाळीतील कोणता तरी सण समारंभ असावा अस वाटत आहे. कारण अस निदर्शनास येत आहे की सगळ्या स्त्रियांच्या साड्या एकाच डिझाईनच्या दिसत आहेत. तसेच आपल्या या आजींसोबत नाचत असलेली मुलंही एकाच डिझाईनचे शर्ट घालून असतात. असो. तर हा लेख आहे आजींच्या भन्नाट डान्सचा. व्हिडियो रेकॉर्ड करायला घेतात तेव्हा ‘शांताबाई’ हे प्रसिद्ध गाणं सुरू झालेलं असतं. आजींसोबत एक दादा सुद्धा नाचताना आपल्याला दिसेल.

सुरुवातीला त्याच्या हातात एक छोटस बाळ असतं. पण मग जशा आजी नाचायला सुरवात करतात तेव्हा तसा तो दादासुद्धा त्या आजीला नाचण्यात साथ द्यायला लागतो. वेगवेगळ्या डान्स स्टेप्स करत आजींचा डान्स बिनधास्तपणे चालू असतो. त्यांना ज्या ज्या स्टेप्स सुचतील त्या न लाजता त्यांचा डान्स परफॉर्मन्स चालू असतो.

आजूबाजूने येणाऱ्या जाणाऱ्या स्त्रिया त्यांच्याकडे कौतुकाने बघत असतात. आजी आपल्या नाचात दंग झालेले असताना एक ताई तर या आजींचा गालगूच्चा घेतात. पण आपल्या आजींचं मात्र ठरलेलं असतं , मस्त मनापासून डान्स करायचा. त्यामुळे बाकीचे काय करतात याकडे आजीचं फारसं लक्ष नसतं.

या डान्समध्ये त्यांना साथ मिळते ती वर उल्लेख केला त्या दादाची. पण त्याचीही आजींच्या डान्स स्टेप्स मुळे हसून हसून दमलेला असतो. इतका हसतो की आजीला डान्स मध्ये साथ देता देता दादा ही एके ठिकाणी हात जोडतो. या आजींच्या उत्साहाला नकळतपणे त्याने केलेलं वंदन केलेलं आहे, अस म्हणायला काही हरकत नाही.

कारण आजींचा हा उत्साह बघून त्या दादा प्रमाणेच तुम्हीही आजींचं कौतुक कराल. त्यांच्या या चिरतरुण वृत्तीसाठी त्यांना दाद देत असतो. असाच हा उत्साह आपल्याही आयुष्यात आपल्या त्या वयात असावा अस आपल्या मनाला नकळत वाटून जातं. तुम्हालाही असच काहीसं वाटत असेल ना ?

मग वाट बघू नका मंडळी. आपल्याला हा व्हिडियो तर अवडणारच. पण सोबत काही कमेंटही आपण नोंदवू शकता. वर उल्लेख केल्याप्रमाणे काही विचारही आपल्या मनात डोकावून गेले असतील. त्यातच आजींचं कौतुकही करावंसं वाटलं असेल.

आजींचं जसं आम्हाला कौतुक वाटलं तसंच आपल्या मनातली कौतुकही कळू द्या.

सोर्स :- मराठी गप्पा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *