पालक मुलांच्या संगोपनात सर्वकाही सोडून देतात. स्वतःचा घास मुलांना भरवून स्वतः मात्र भुकेल्या पोटी झोपतात, परंतु आपल्या मुलांना रिकाम्या पोटी झोपू देत नाहीत.
तीच मुले मोठी होऊन आपल्या पालकांना वृद्ध अवस्थेत एकटे सोडतात. अशा मुलांना धडा शिकवण्यासाठी महाराष्ट्रातील लातूर जिल्हा परिषदेने एक उदाहरण मांडले आहे.
ही एक सत्य घटना आहे. परिषदेने अशा कर्मचार्यांचे पगार ३० टक्क्यांनी कमी केले आहेत. जे त्यांच्या पालकांना त्यांच्याबरोबर ठेवत नाहीत, त्यांचा नीट सांभाळ करीत नाहीत.
जिल्हा परिषदेने अशा ७ कामगारांच्या पगारामध्ये ३० टक्क्यांनी कपात करण्यास सुरवात केली आहे. लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल बोंद्रे म्हणाले की, १२ कर्मचार्यांनी आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल तक्रारी आल्या आहेत.
यापैकी काही कर्मचारी हे शाळेचे शिक्षक आहेत. जर शिक्षकच असे वागत असतील तर, ते विद्यार्थ्यांना काय शिकवणार. म्हणून त्यांनाच धडा शिकवायची गरज होती.
पालकांच्या खात्यात रक्कम हस्तांतरित(ट्रान्सफर) :-
राहुल बोंद्रे म्हणाले की, वजा केलेली रक्कम या कर्मचार्यांच्या पालकांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लातूर जिल्हा परिषदेच्या महासभेने आपल्या आईवडिलांची काळजी न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये ३० टक्क्यांनी कपात करण्याचा ठराव मंजूर केला.
बोंद्रे यांनी सांगितले की दोषींच्या मासिक वेतनातून ३० टक्के कपात करून रक्कम आईवडीलांच्या खात्यात जमा करण्याची पद्धत डिसेंबर २०२० पासून सुरू करण्यात आली.