विडिओ : मगरीने कासवाला आपलं भक्ष्य बनवणार तेवढ्यातच घडलं अस काही….बघा विडिओ

। नमस्कार ।

मगर एक इतर प्राण्यांच्या तुलनेत सर्वात शक्तिशाली उभयचर प्राणी आहे. पाण्यात तर मगरीची शक्ती दुप्पट गतीने वाढते. त्यामुळे पाण्यात मगरीशी वैर नको, अशी म्हण प्रसिद्ध आहे. एकदा का मगरीच्या तावडीत एखादा प्राणी सापडला की, त्याचा जीव वाचणं कठीण असतं.

मगरी इतक्या मोठ्या आणि ताकदवर असतात की, शिकार लहान असेल तर ते त्यांना सरळ गिळून टाकतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही चकित व्हाल. एक मगर चक्क कासवाला गिळून टाकण्याचा प्रयत्न करत आहे.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक मोठी मगर एका छोट्या कासवाला आपलं भक्ष्य बनवताना दिसत आहे. पण कासवाची पाठ टणक असल्याने मगरीला त्या कासवाला गिळता येत नाही आहे. त्यानंतर खूप मुश्किलीने मगर आपल्या तीक्ष्ण दातांनीसुद्धा कासवाला खाण्याचा प्रयत्न करताना दिसते.

पण त्या मगरीला खूप प्रयत्न करूनसुद्धा त्यात यश संपादन करता येत नाही. गिळता येत नसल्या कारणामुळे शेवटी मगर त्या कासवाला सोडून देते. मगरीच्या तावडीतून सुटल्यानंतर कासवही हळू हळू त्या मगरिपासून दूर निघून जाते. मगर अपयशी झालेली तुम्ही क्वचितच पाहिल असेल.

हा व्हिडीओ अपलोड केल्यापासून आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला असून Scienceturkiyeofficial या Youtube अकाउंटवरून सामायिक करण्यात आला आहे. सोशल मीडिया वापरकर्ते हा व्हिडीओ आपआपल्या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.

तसेच नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देखील देत आहेत. एका युजरने लिहीलं आहे, “मगरीला आता डेन्टिस्टकडे जावं लागेल. दात नक्कीच पडले असतील”. दुसऱ्या युजर्सने लिहीलं आहे, “कोणती टूथपेस्ट वापरते यावर सर्व अवलंबून आहे.’’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *