। नमस्कार ।
सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे ज्याचा वापर आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती करतो. ज्यावर आपण आपले मनोरंजन करण्यासाठी काही ना काही व्हिडीओ पाहत असतो. सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी आपले मनोरंजन करतात तर काही व्हिडीओ हे आपल्या अंगावर काटा उभा आणणारे असतात.
असेच बऱ्याचदा सोशल मीडियावर बिबट्याने अनेक प्राण्यांची शिकार करतानाचे अनेक व्हायरल व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळाले असतील, पण बिबट्याला हवेत उडून हरणाची शिकार करताना तुम्ही कधी पाहिले आहे का?
आज आम्ही तुमच्यासाठी असाच धक्कादायक व्हिडिओ घेऊन आलो आहोत, जो भारतीय वन सेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे, जो आतापर्यंत ४२ हजार पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे.
या व्हिडीओमध्ये हरणांचा कळप झुडपांतून पळत येत असल्याचे दिसून येते कारण बिबट्या त्या शिकारची शिकार करण्यासाठी त्यांच्या मागे धावत आहे. त्याला पाहून हरणांचा कळप जीव वाचवण्यासाठी धावत असतानाच त्यातील एकाने हवेत उडी घेतली आणि बिबट्याने त्या हरणाची हवेतच शिकार केली.
Flying catch🙂
🎥life & Nature pic.twitter.com/39ATvCyVck— Susanta Nanda IFS (@susantananda3) February 11, 2022
नेटकरी हा जबरदस्त व्हिडिओ शेअर करत आहेत आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले, “यातून एक शिकायला मिळत की , कधी कधी आपल्यालाही आपल्या ध्येयाचा पाठलाग करावा लागतो, केवळ बहाने देऊन ते ध्येय टाळायचं नाही.” तर दुसर्या यूजरने लिहिले, “Wow that is a million dollar shot”.