विकेट घेतल्यानंतर ब्रावो ने केला पुष्पा अंदाज मध्ये उत्साह , बघा हा वायरल विडिओ

। नमस्कार ।

सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे ज्याचा वापर आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती करतो. ज्यावर आपण आपले मनोरंजन करण्यासाठी काही ना काही व्हिडीओ पाहत असतो. सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी आपले मनोरंजन करतात तर काही व्हिडीओ हे आपल्या अंगावर काटा उभा आणणारे असतात.

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्ही तुमचे हसून हसून पोट दुखायला लागेल. साऊथ मधील सुप्रसिद्ध अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना  यांचा हल्लीच रिलीज झालेल्या ‘पुष्पा’ (Pushpa) चित्रपटाने सर्वांनाच वेड लावले आहे. इतकेच नव्हेतर त्या चित्रपटातील गाण्याने ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली…’ तर लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना वेड लावलं आहे.

या गाण्यावर कोणीही स्वत:ला डान्स करण्यापासून रोखू शकत नाहीये. पुष्पा चित्रपट 17 डिसेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. तेंव्हापासून प्रत्येकाला या चित्रपटाच वेड लागलं आहे.

पुष्पा चित्रपटातील गाण्यावर केला भर मैदानात  विकेट घेतल्यावर ब्रावोचा डान्स वायरल :- विशेष म्हणजे केवळ ‘पुष्पा’ हा चित्रपटच नाही तर चित्रपटातील गाणीही इतकी सुपरहिट झाली आहेत की, जगभरातील बहुतेक सुपरस्टारदेखील त्यावर रील्स बनवताना आणि ऍक्शन करताना दिसत आहे.

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावोला ही चित्रपट खूपच आवडलेला दिसत आहे. विशेष म्हणजे ब्रावोने विकेट घेतल्यानंतर भर मैदानात अल्लू अर्जुनच्या स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहे. ड्वेन ब्रावोने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. परंतु तो T20 लीगमध्ये खेळतो. ब्रावोचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ब्रावो चक्क विकेट घेतल्यानंतर भर मैदानामध्ये श्रीवल्ली गाण्याच्या स्टेप्स करताना दिसत आहे.

तेरी झलक शरफी श्रीवल्ली या गाण्यावर ब्रावो अल्लू अर्जुनची स्टाईल मारण्याचा प्रयत्न करतो आहे. ब्रावोच्या चाहत्यांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. याआधी डेव्हिड वॉर्नरने देखील चित्रपटातील गाण्याशी संबंधित एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याच्या मुली हा डान्स करत आहेत. वॉर्नरने स्वतः व्हिडीओ बनवून ‘मैं झुकेगा नहीं’वरील पुष्पा चित्रपटाचा एक सीन शेअर केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *