। नमस्कार ।
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने आपल्या लिफ्टमध्ये फसलेल्या एका कुत्र्याला वाचवल्याचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होतांना दिसत आहे. तर हा व्हिडीओ एका परदेशातील टेक्सासमधील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे, असे सांगितले जात आहे.
याशिवाय, हा व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला एका अपार्टमेंट मध्ये पहिल्या मजल्यावरून लिफ्टच्या मदतीने वर जाण्यासाठी लिफ्ट मध्ये गेल्यावर तिच्या हातातील पट्टा धरून ती लिफ्टमध्ये शिरताना दिसत आहे. ती लिफ्टमध्ये जाते तर तिचा कुत्रा लांब पट्ट्याने वर येण्यासाठी इकडे तिकडे फिरत असतो.
पण या दरम्यान चुकून तिच्या नजरचुकीने तिच्या हातात असलेल्या कुत्र्याचा पट्टा तिच्या हातात राहिल्यामुळे ती लिफ्टमधील वरती जाण्याचे बटन दाबत आणि मग तिच्या लक्षात येतं की, पण ते कुत्र्याचे पिल्लू त्या लिफ्टच्या बाहेरच आहे आणि फक्त बेल्ट तिच्या हातात आहे. मात्र “देव तारी, त्याला कोण मारी”, या म्हणीप्रमाणे त्या लिफ्टच्या बाहेर उभे असलेल्या एका व्यक्तीनें ताबडतोब चपळता दाखवून त्या कुत्राचा बेल्ट तोडला आणि त्या कुत्र्याचे प्राण वाचवले.
ही घटना घडली तेव्हा जॉनी मॅथिस त्याच्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या तळघरातील गॅरेजमध्ये कार पार्क करून घरी परतत होते. तो त्याच्या अपार्टमेंटच्या तळमजल्यावर राहत होता आणि जेव्हा त्याच्यासमोर नाट्यमय दृश्य उलगडले तेव्हा तो लिफ्ट त्याच्या मजल्यावर घेऊन जात होता. त्याने या घटनेबद्दल ट्विटरवर म्हटले आहे की, “तुम्ही हादरलोय!!! दरवाजा बंद होण्यापूर्वी मालकासह लिफ्टवर न चढलेल्या एका कुत्र्याला मी वाचवले!
View this post on Instagram
मग नंतर लिफ्टचा दरवाजा बंद केल्यानंतर, कुत्र्याचा मालक कुत्रा मेला असा विचार करून रडताना ऐकू येत होता. मात्र त्यानंतर आपला कुत्रा सुरक्षित असल्याचे पाहून कृतज्ञता व्यक्त केली. तो म्हणाला की आपण कोणाची तरी मदत केली आणि एक भीषण अपघात टळला याचा मला आनंद आहे.