रेल्वे रुळ क्रॉस करताना काळजी घ्या नाहीतर….या तरुणासोबत काय घडलं पाहा व्हिडीओ

। नमस्कार ।

 बऱ्याचदा बरीच लोक रेल्वे रूळ क्रॉस करताना स्वतःच्या जीवाची काळजी करताना दिसत नाहीत. रेल्वे फाटक जास्त वेळ पडून असल्यामुळे तो रस्ता बंद होतो म्हणून गडबडीने हे फाटक ओलांडण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो. आजही अनेक गावांमध्ये आपल्याला अशीच परिस्थिती पाहायला मिळते.

सारखं फाटक पडत राहातं , त्यामुळे उशीर होतो म्हणून फाटक ओलांडण्याच्या गडबडीत बरेचदा गोष्टी आपल्याच जीवावर बेततात, याचा कोणीही कधीही विचार करत नाहीत. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही ही अशी चूक करणे किती धो’क्याचं ठरेल ते लक्षात येईल.

या व्हिडीओमध्ये आपल्याला असे दिसून येत आहे की , रेल्वे फाटक पडण्याची वेळ झाली आहे. हे फाटक ओलांडून जाण्यासाठी गाड्या वेगानं इकडून तिकडे , तिकडून इकडे ये जा करताना दिसत आहेत. फाटक पडत असताना त्याचा अलर्ट देखील तेथील लोकांना दिला जातो.

ते फाटक पडल्या पडल्या वेगानं येणारा दुचाकीस्वार नेमका त्या फाटकात अडकला. रेल्वे रुळ क्रॉस करायच्या नादात स्कुटरचा वेग वाढला आणि जीवावर बेतता बेतता राहीला.

रेल्वे फाटक पूर्ण बंद व्हायला आणि वेगानं आलेला दुचाकी स्वार त्या फाटकावर जोरात धडकला. @DoctorAjayita ट्वीटर वापरकर्त्याने याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ३४ हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे आणि ३ हजारहून अधिक लोकांनी ह्या व्हिडीओला लाईक केलं आहे. अनेक युझर्सनी आपलं मत सुद्धा या व्हिडीओबाबत मांडलेलं आहे.

काही युझर्सनी कमेंट भागात असे प्रकार टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यासंदर्भात काही टिप्स सुचवल्या आहेत. तर एक युझर म्हणाला कधी सुधारणार? बॅरिकेट बंद केल्यानंतरही बऱ्याचदा लोक बाईक त्याच्या खालून घेऊन जातात.

त्यामुळे बाईक आणि बाईक चालकाच्या जीवाला तर धोका असतोच पण ट्रेनही वेगात असते. या सगळ्या गोष्टी समजूनही बऱ्याचदा अशा प्रकारच्या चूका लोक करतात असंही युझर म्हणाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *