l नमस्कार l
एका मुलीचा स्कूटी चालवितानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र वायरल होत आहे. असं काहीसं यात पाहायला मिळालं आहे की आपलं हसणं थांबणार नाही आणि हा व्हिडीओही पुन्हा पुन्हा पाहावासा वाटेल.
अल्पावधीतच हा व्हिडीओ हजारो वेळा पाहिला गेला असून मोठ्या संख्येने लोकांनी लाइक केले आहे. समोर आलेल्या काही सेकंदांच्या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की रस्त्यावरून वाहने आरामात जात आहेत.
तेवढ्यात स्कूटीवर स्वार असलेली एक मुलगी फ्रेममध्ये आली आणि मधल्या रस्त्यावर स्कूटी थांबवून सेल्फी घेण्यास सुरुवात केली. यानंतर फ्रेममध्ये जे काही दिसेल, ते पाहून पोट धरून हसायला भाग पडेल.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मुलगी रस्त्याच्या मधोमध सेल्फी घेत आहे आणि ट्रॅफिक जामची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र तेवढ्यात एक व्यक्ती त्या मुलीजवळ येते आणि तिला स्कूटी रस्त्याच्या कडेला नेण्यास सांगितले. मुलीने समोरच्या व्यक्तीशी वाद घालण्यास सुरुवात केली हे मजेशीर आहे.
आता यानंतर जे काही फ्रेममध्ये दिसत आहे ते सर्वात मजेदार आहे. मुलीच्या अशा प्रतिक्रियेनंतर त्या व्यक्तीला खूप राग आला आणि त्या व्यक्तीने तिची स्कूटी ओढून रस्त्याच्या कडेला उभी केली.
View this post on Instagram
गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. इंस्टाग्रामवर bhutni_ke_memes नावाच्या पेजवरही ते अपलोड करण्यात आले आहे.