। नमस्कार ।
आपल्या सर्वांना माहीतच असेल की सापाला बघून भल्याभल्याची घाबरगुंडी कशी उडते. पण ऑस्ट्रेलियामधील फक्त २ वर्षांच्या मुलाने त्या मोठ्या सापासोबत असे काही केलं, जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा ध’क्का बसला. मुलाने या 2 मीटर लांब सापाला हातात पकडून तो त्याच्यासोबत खेळू लागला.
त्या मुलाच्या वडिलांनी स्वतःच हा व्हिडिओ शूट करून स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात हा चिमुकला सापावर नियंत्रण मिळवताना दिसत आहे. त्यामुळेच आज आपण या ‘शूर’ मुलाबद्दल जाणून घेऊया.
‘डेली मेल’ ने दिलेल्या वृत्तानुसार, हा छोटा मुलगा ऑस्ट्रेलियामधील प्रसिद्ध व्यक्ती मॅट राईट यांचा मुलगा आहे. वन्य प्राण्यांना, विशेषतः मगरींना वाचवण्यासाठी मॅट यांना ओळखलं जाते. गेल्या 20 वर्षांपासून ते ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडच्या भागातील मगरींना पकडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करत आहेत. मॅट राईटने अलीकडेच त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे.
या व्हिडिओमध्ये त्यांच्या घराच्या बागेतच एक लांब साप दिसतो आहे. साप खूपच भया’नक आणि मोठा दिसतो आहे. हा साप मॅट राईटच्या २ वर्षांच्या मुलाने पकडला आहे. पूर्ण आत्मविश्वासाने या छोट्या मुलाने त्या मोठ्या सापाची शेपटी दोन्ही हातांनी धरून त्याला तो ओढताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये, मॅट त्यांच्या भाषेत म्हणतो की- “त्याला बाहेर काढ, त्याला बाहेर काढ. त्याला झुडपाकडे ने.”
व्हिडिओमध्ये मॅट आपल्या मुलाला सापाला कसा पकडायचे हे शिकवत आहेत. मुलाला साप बागेतून बाहेर काढण्यासाठी खूप धीर देण्याचा प्रयत्न करताना मॅट दिसत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स यावर केल्या आहेत. काहींनी त्याला ‘शूर बालक’ म्हटले तर काहींनी त्याला सापांसोबत खेळू नका असा सल्ला दिला.