l नमस्कार l
जर तुम्हीही सोशल मीडिया युजर असाल तर तुम्हाला माहितीच असेल की,” कच्चा बदाम” हे गाणं किती ट्रेंडवर होतं. एका लहान शाळकरी मुलीने या गाण्यावर अत्यंत सुंदर डान्स केलेला आहे आणि तो व्हिडिओ सध्या खूपच वायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत खूप लाईक्स आलेल्या आहेत.
चार महिने झाले या गाण्याचा खूप ट्रेंड सोशल मीडियावर आहे. सगळ्यांनीच या गाण्याला खूप डोक्यावर घेतलं आहे. लोकं या गाण्यावर डान्स करून रिल्स, स्टोरी सगळीकडे शेअर करत आहेत. सध्या सोशल मीडियावर या गाण्यावर डान्स करतानाचा एका लहान मुलीचा व्हिडिओ खूप वायरल होत आहे. हिच्या विडिओला लोकांनी खूप पसंत केलेले आहे.
वायरल व्हिडीओमध्ये एक लहान गोड मुलगी या “कच्चा बदाम” या गाण्यावर नाचत आहे . ” कच्चा बदाम ” हे गाणे सोशल मीडियावर सध्या खूप गाजत आहे. या व्हिडीओमध्ये ती मुलगी इतक्या छान पद्धतीने नाचत आहे की, तुम्हाला बघून खूप छान वाटेल. या विडिओवर अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.
Cutest ‘कच्चा बादाम’ ❤️ pic.twitter.com/YRln8CNA4X
— Awanish Sharan (@AwanishSharan) March 13, 2022
अवनीश शरण नामक व्यक्तीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केलेला आहे. या विडिओसोबत अवनिशने कॅप्शनमध्ये “सर्वात गोड कच्चा बदाम’ असे लिहून हा व्हिडीओ शेअर केलेला. आतापर्यंत या व्हिडिओला १४२००पेक्षाही जास्त लाईक्स मिळालेल्या आहेत. तसेच ३००हून अधिक जणांनी त्यावर कमेंट केलेल्या आहेत.