या व्यक्तीने स्वतःचे प्राण धोक्यात घालूनमहारापुरात अडकलेल्या 2 मुलांना दिले जीवदान, पहा संपुर्ण व्हिडीओ…

। नमस्कार ।

या सोशल मीडियाच्या जमान्यात आपल्याला दररोज हजारो अनेक प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळत असतात, त्यातील एक महापुरातून स्वतःचा जीव धोक्यात घालून 2 मुलांना वाचवत असलेल्या एका व्यक्तीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

सध्या पावसाळ्यात सगळीकडे पाणी, पूर इ. भीषण पूर आणि पुरामुळे अनेक लोकांचे घर, परिवार उद्ध्वस्त झाले असल्याचे अनेक वेळा पाहायला मिळते, तर कोणी आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावत असतो.याशिवाय, परवा आसाममध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे एवढी विध्वंस झाली आहे की, हजारो घरे पाण्याखाली गेली आहेत, लोकांना स्थलांतर करावे लागले आहे. पुरामुळे रस्ते तुटले आहेत, रस्ते बंद झाले आहेत, नद्यांना पूर आला आहे.

लोकांच्या सोयीसाठी बांधलेले पूलही अनेक ठिकाणी तुटले असल्याचा बातम्या ऐकायला मिळत असतात. त्यामुळे सोशल मीडियावर अशी दृश्ये बघायला मिळतात की लोकांचाही आत्मा हादरला आहे. आजकाल असाच एक तुफान व्हायरल होत असलेला धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतोय. तर धक्कादायक व्हिडीओ ओमान मधील एका ठिकाणाचा असल्याचे सांगितले जात आहे. तर या व्हिडिओमध्ये 2 मुले पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून जाणार असताना एका व्यक्तीने जीवावर खेळून त्यांचा जीव वाचवला.

महापूरच्या वेळी नदीत लोक उतरण्यासही संकोच करत होते, ती व्यक्ती त्या जोराच्या प्रवाहात खाली उतरली आणि जीववर खेळून मुलांना घेऊन किनाऱ्यावर गेली. याशिवाय, आपण त्या पात्रातील पाण्याचा प्रवाह किती वेगवान होता, हे व्हिडिओमध्ये पाहून समजू शकता. त्यामुळे चुकून कुणी पाण्यात उतरलं तरी ती त्याला मैल मैलांपर्यंत घेऊन जाईल आणि त्यानंतर त्याचा जीव वाचेल की नाही हे कुणीच सांगू शकत नाही. अशा पुरात उतरण्याचे धाडस त्या व्यक्तीने दाखवले आणि पाण्याच्या मधोमध दोन मुलांना पकडून आपल्यासोबत किनाऱ्यावर आणले, त्यानंतर किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या लोकांनीही त्याला मदत केली.

तर दरम्यान ओमानमध्ये नुकताच मुसळधार पाऊस आणि अचानक आलेल्या पुराच्या दरम्यान , एका धाडसी माणसाने आपला जीव धोक्यात घालून दोन मुलांना चिघळत असलेल्या नदीत बुडण्यापासून वाचवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि वापरकर्त्यांनी दावा केला आहे की, ज्या व्यक्तीने मुलांना वाचवले ते त्यांचे वडील आहेत. मात्र काही लोकांनी हा दावा खोटा असल्याचे सांगितले आहे.

तर हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला असून त्या व्यक्तीचे ‘धाडसी’ असे वर्णन करण्यात आले आहे. अवघ्या 24 सेकंदांचा हा व्हिडीओ आतापर्यंत 1 मिलियन पेक्षा जास्त म्हणजेच 10 लाख पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *