। नमस्कार ।
जगात कोण कधी काय करेल हे कोणालाही सांगता येत नाही. जगभरात संशोधकवृत्तीच्या लोकांची अजिबात कमतरता नसतात याची अनेक उदाहरणं समोर येत असतात. अशाच एका संशोधना ची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे. हे उदाहरण म्हणजे चक्क चारचाकी कारच्या इंजिनपासून हेलिकॉप्टर बनवण्याचं. हा व्यक्ती केवळ हेलिकॉप्टर बनवून तिथवरच थांबला नाही तर त्याने त्याने बनवलेल्या हेलिकॉप्टरचं यशस्वी उड्डाणही करून दाखवलं. या उड्डाणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहे आणि हा चर्चेचा विषय ठरत आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ जास्त शेअर केला जात आहे त्यात एक व्यक्ती मोटारसायकलसारखं वाहन रस्त्यावर आणतो. मात्र, या वाहनाला वरच्या बाजूला पंख्यासारख मोठे पाते आणि मागच्या बाजूला छोटे पाते दिसत असल्याने ते हेलिकॉप्टरप्रमाणे दिसत आहे. सुरुवातीला या वाहनाची पाती फिरू लागतात. नंतर ते वेगाने फिरू लागतात. या नंतर वाहनात बसलेला व्यक्ती ते वाहन सुरू करतो आणि वाहन रस्त्यावर पळायला सुरुवात होते.
पळणारं वाहन हवेत उडालं आणि लोक चकीत झाले :- सुरुवातीला हा व्हिडीओ पाहणाऱ्यांना हा एखाद्या गाडीपासून हेलिकॉप्टर तयार करण्याचा एक गावठी। जुगाड असल्याचं आणि त्याच्या उड्डाणाचे प्रयोग होत असल्याचं वाटतं. मात्र, रस्त्यावर धावणारे हे वाहन पुढे लांब जाते आणि अचानक हवेत उड्डाण घेते. यावेळी हे सर्व पाहणाऱ्या आजूबाजूच्या लोकांचे आश्चर्याचा धक्काच बसतो आणि आनंद झालेले संवादही व्हिडीओमध्ये ऐकायला मिळतात. वाहनाने हवेत उड्डाण केल्यानंतर हे लोक आनंदाने ओरडताना ऐकायला येतात.
Homem no interior do RN constrói helicóptero com restos de carros e motor de fusca, faz teste e decola. pic.twitter.com/4zpS1jvy9p
— Меndes (@MendesOnca) December 9, 2021
सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ही बातमी लिहिपर्यंत या व्हिडीओला तब्बल १६ लाखहून अधिक व्ह्यूज मिळाले होते. याशिवाय जवळपास १५ हजार लोकांनी हा व्हिडीओ रिट्वीट केला होता. यावर कमेंट्सचा तर पाऊस पडलाय. अनेकजण या नवीन प्रयोगाच भरभरून कौतुक करत आहेत.