। नमस्कार ।
कुत्रे मुलांचे खूप चांगले मित्र असतात आणि हे कुत्रे लहान मुलांची खूप काळजी घेत असतात. कुत्री लहान मुलांसोबत खूप खेळतात आणि त्यांची विशेष काळजी देखील घेतात. कुत्र्यांशी मस्ती करताना आणि खेळतानाचे अनेक व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत सोशल मीडियावर पाहिले असतील. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक व्हिडिओ घेऊन आलो आहोत.
या व्हिडिओमध्ये एक छोटं बाळ आणि कुत्रा दोघेही एकमेकांसारखे वागत म्हणजे एकमेकांची नक्कल आणि मजा करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये लहान कुत्रा त्याच्यासोबत लहान मुलासारखा खेळताना दिसत आहे. या वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक लहान मूल जमिनीवर पडलेले पुढे जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्याच वेळी, लहान कुत्रा देखील त्याच्या शेजारी जमिनीवर पडलेला आहे आणि लहान मुलाप्रमाणेच पुढे जाण्याचे नाटक करतो.
यानंतर, व्हिडिओमध्ये पुढे असे दिसते की जेव्हा लहान मूल उठण्याचा प्रयत्न करते तेव्हा लहान कुत्राही उठतो, परंतु थोड्याच वेळात तो पुन्हा जमिनीवर पडण्याच्या स्टाईलमध्ये येतो आणि मग मस्ती करत पुढे जातो.
You gotta crawl…like this. 😁😇👶🐶 pic.twitter.com/qVIgdJ2wCt
— Laughs 4 All 🤟 (@Laughs_4_All) January 14, 2022
या व्हिडीओमुळे सोशल मीडिया यूजर्सचे मन प्रसन्न केले आहे. प्रत्येकाला हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहायला आवडतो. अशी कृत्ये केल्याने हे मूल लवकर चालायला शिकू शकते, असा विश्वास नेटिझन्सचा आहे.