। नमस्कार ।
किती तरी लोक त्यांच्या आवडीच्या खेळाचे इतके वेडे असतात की ते फक्त मैदानातच नव्हे तर मैदानाबाहेरही ते रस्त्यावर चालतानाही खेळताना आपल्याला दिसत असतात. मग तो खेळ क्रिकेट असो वा फुटबॉल कुठेही आणि केव्हाही ते खेळण्यापासून ज्याला आवड आहे ते स्वतःच्या मनाला रोखू शकत नाहीत.
पण त्यांचा हा रस्त्यावरील खेळ इतर रस्त्यावरून ये जा करतात त्यांना मात्र महागात पडू शकतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. रस्त्यावर बॉलमुळे बाईकचालकाचा तोल जाऊन गोल कसा झाला हे तुम्हाला विडिओ मध्ये दिसेल.
बॉलमुळे बाईक घसरून पडली आणि अपघाताचं हे भयंकर दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडीओत पाहू शकता की एक तरुण रस्त्यावर बॉलसोबत खेळत जात होता. त्याच्या हातातून बॉल अचानक सुटतो आणि तो रस्त्याच्या मधोमध जातो. इतक्यात तरुणाच्या मागच्या दिशेने बाईक येत होती. बॉल बाईकच्या बरोबर मधोमध येतो आणि बाईकस्वाराचं बाईकवरील नियंत्रण सुटत. बाईक धाडकन तिथेच तोल जाऊन कोसळते. या बाईकवर दोन तरुण बसलेले आहेत. तेसुद्धा जमिनीवर बाईकबरोबर पडतात.
Loose ball foul. 🥴🍺🏀 pic.twitter.com/ULrgINOCbs
— 🍺 Hold My Beer 🍺 (@HldMyBeer) October 16, 2021
सुदैवाने दोघांना सुद्धा काही गंभीर दुखापत झालेली दिसत नाही. बाईक घसरून पुढे गेल्यामुळे त्यांना फार दुखापत झाली नाही. दोघंही स्वतःच उठतात. पण त्यांना बॉल खेळणाऱ्या तरुणाचा खूप राग आलेला दिसतो. होल्ड माय बिअर ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.