या भयानक पूर आलेल्या नदीने एका शेतकऱ्यालाच घेतलं सामावून , निसर्गापुढे स्थानिकांची मदत पण अपयशी , बघा विडिओ

। नमस्कार ।

सध्या संपूर्ण ठिकाणी देशभरात पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यादरम्यान काही ठिकाणी रस्ता खचला आहे , दरडी कोसळल्या आहेत अश्या घटनांमुळे अनेकांना निष्पाप माणसांना , प्राण्यांना स्वतःचा जीव गमवावा लागला आहे. या काळात सोशल मीडियावर वायरल झालेले व्हिडीओ पाहून अंगावर काटा उभा राहतो. महाराष्ट्रातून तर वायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये तर नदीच्या पुराच्या पाण्यात मृतदेह वाहताना दिसून आलं आहे. हे सर्व चित्र हृदय पिळवटून टाकणारं आहे.

दरम्यान उत्तर प्रदेशातून सुद्धा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोनभद्र येथील कुलडोमरीच्या पडरवा गावातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. या गावातील ५५ वर्षीय शेतकरी राम कैलाश शेतात काम करण्यासाठी गेले होते. ते पूर आलेली नदी ओलांडत असताना ते नदीच्या पुराच्या प्रवाहात वाहून गेल्याचा हा व्हिडीओ आहे. नदीच्या पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्यामुळे ते वाहत लांबपर्यंत वाहत गेल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

त्यांना वाहताना पाहून अनेक गावकरी त्यांच्या मदतीसाठी पुढे आले. अनेकांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी हात देण्याचा प्रयत्न केला , मात्र निसर्गाच्या शक्तीपुढे माणसाचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. यादरम्यान काहींनी या प्रसंगाचा व्हिडीओ शूट केला आहे. जो आता व्हायरल होत आहे.

समोर आपल्यातलाच एक व्यक्ती वाहत जात आहे, परंतु आपण समोर असूनही आपण काहीच करू शकलो नाही, ही भावना तेथील उपस्थित असलेल्या लोकांना त्रास देणारी आहे. निसर्गाच्या शक्तीपुढे कोणाच काहीच चालू शकत नाही असं म्हणतात ते हे.

त्या नदीच्या प्रवाहात एक शेतकरी वाहून गेल्याची बातमी तातडीने प्रशासन आणि पोलिसांना कळविण्यात आली. पोलीस स्थानिक गोताखोरांच्या मदतीने शेतकऱ्याला शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत पण अद्याप ही त्या व्यक्तीचा शोध लागला नव्हता. जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान अनेकांचा जीवही धोक्यात आहे.

आतापर्यंत अनेक भागात अशा प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे पावसादरम्यान नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे.

बघा विडिओ : 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *