या ताईने उत्कृष्टरीत्या वाजवला तबला , पाहून मंत्रमुग्ध व्हाल , एकदा बघाच विडिओ

। नमस्कार ।

असे म्हटले जाते की देवाने माणसाला निर्माण केले आहे. आणि प्रत्येक माणसाला त्याने कोणते ना कोणते कौशल्य दिले आहे. त्यातच कला ही देखील माणसाला त्याच्याकडून मिळालेली देणगीच आहे.

कला ही काय लिंग, धर्म बघून नाही देत. प्रत्येक माणसाकडे काही ना काही कला असते. काही जणांकडे नृत्यकला असते,तर काही जणांकडे गायन, शिल्प, वादन, इ. अश्या अनेक कला असतात. फक्त आपण आपल्यामधील ते कौशल्य, ती कला शोधून काढायला हवी व तिचे जतन करायला हवे. आणि तिचा योग्यप्रकारे वापर करायला हवा.

संबंधित व्हिडिओ हा अश्याच एका कलेबद्दल आहे. वादन. वादन ही एक अशी कला आहे ज्यात तुम्ही एखाद्या वाद्याने कोणाच्याही मनाला भुरळ पडू शकता, कोणाच्याही हृदयावर आपली छाप पाडू शकता. त्याचे मन प्रसन्न करू शकता.

व्हिडिओमध्ये व्यक्ती तबला वाजवत आहे. तबल्याचे जादूगार झाकीर हुसैन यांना तर तुम्ही ओळखत असालच. आपल्या भारतात अनेक पुरुष मंडळी तबला वाजवताना तुम्ही पाहिले असेल, परंतु एखाद्या स्त्रीला तबला वाजवताना क्वचीतच पाहायला मिळते.

सदर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ,चार महिला मिळून भजन करत आहेत, त्यात एक तबला वादन करत आहे आणि एक मुख्य गायिका आहे व दोघी तिला साथ देत आहेत. चौघिनी मिळून खूप छान प्रकारे कार्यक्रम पार पडला आहे. पण लोकं तबला वाजणाऱ्या स्त्रीचे खूप कौतुक करत आहेत. तिने खूप छान तबला वाजवला आहे.

त्यांनी मिळून “झाल्या तिन्ही सांजा” या गाण्यावर उत्कृष्ट परफॉर्मन्स दिलेला आहे. त्यांनी हा कार्यक्रम अत्यंत सुदंर रित्या पार पडलेला आहे, हे बघून आपल्याला हेवा वाटेल. असेच जर प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनाही संधी मिळत गेल्या तर त्याही त्यांची कला, हूनर लोकांसमोर सादर करू शकतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *