। नमस्कार ।
सापाचं नाव ऐकताच भल्या भल्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. अशातच समजा तुमचा सामना एखाद्या मोठ्या सापाशी झाला तर ? सहाजिकच तुमची घाबरगुंडी नक्कीच उडेल. एकीकडे काही लोकांना सापाचं नाव जरी ऐकलं तरी भीती वाटते, तर दुसरीकडे काही लोकं मात्र सापाला अजिबातही घाबरत नाहीत.
सध्या इंटरनेटवर असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात एका महिलेने हातात किंग कोब्रा साप पकडलेला दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून पाहणारेही हैराण झाले आहेत.
सोशल मीडियाच्या दुनियेत व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला हातामध्ये भलामोठा किंग कोब्रा साप पकडल्याचं दिसून येत आहे. सुरुवातीला ही महिला साप जमिनीवर असताना या सापाला पकडण्यासाठी काठीचा वापर करते, मात्र नंतर ती हातातली काठी बाजूला फेकते.
यानंतर ही महिला आपल्या हातांनीच त्या सापाला पकडण्याचा धाडसी निर्णय घेते. ती सापाला आपल्या हातात पकडल्यावर मागे उभे राहून पाहत असणारे लोक तिला बाहेर येण्यासाठी तिच्या वाटेवरून लगेच बाजूला होतात.
ती धाडसी महिला त्या सापाला हातात पकडून रुममधून बाहेर पडते आणि यानंतर रस्त्याच्या बाजूला जाऊन ती या सापाला तिथेच रस्त्यावर सोडून देते. मात्र, साप घराकडे परत जाण्याचा प्रयत्न करू लागताच ती पुन्हा एकदा सापाला पकडू लागते.
मात्र, यामुळे साप तिच्यावर ह’ल्ला करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, या हल्ल्यापासून ती स्वतःच त्या सापापासून रक्षण करते. यानंतर ही महिला जास्त खेळ न करता त्या सापाला पकडून एका बॅगमध्ये टाकते. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत. Mr Master नावाच्या यूट्यूब चॅनेलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. याला आतापर्यंत दीड लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर, 19 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. महिलेची साप पकडण्याची ही कला पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत. तर, अनेकांनी साप पकडण्याची ही पद्धत धोकादायक असल्याचं म्हटलं आहे.
बघा विडिओ :