या तरुणाला स्टंट करणे पडलं महागात , स्टंट बेतला जीवावर , विडिओ होतोय वायरल

l नमस्कार l

सध्याच्या युगात सोशल मीडिया हा असा एक प्लॅटफॉर्म आहे, जो आपल्याला नवनवीन व्हिडीओ पुरविण्यास मदत करतो. जे विडिओ , जोक्स प्रत्येकाचं मनोरंजन करतात. सोशल मीडियावर आपल्याला मजेशीर कॉमेडी, महत्वाच्या माहिती आणि बरेच विषयाचे व्हिडीओ देखील पाहायला मिळतात.

तसेच अनेक स्टंटचे देखील व्हिडीओ या सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतात. जे आपल्या अंगावर काटा उभा आणणारे असतात. तर कित्येक लोक असे देखील असतात, जे मोठेपणाने स्टंट करायला जातात खरे, पण त्यांच्यासोबत असं काही घडतं, ज्याचा आपणच काय तर ते स्वतासुद्धा विचार देखील करु शकत नाही.

सध्या सोशल मीडियावर असाच एक फेल झालेल्या स्टंटचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो एका एडवेंचर अॅक्टिव्हिटीचा आहे. ज्यामध्ये ही व्यक्ती करायला जाते एक आणि त्याच्यासोबत घडतं भलतंच.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकाल की, एक व्यक्ती डोंगराच्या कडेला उभी आहे आणि त्या व्यक्तीला एक दोरी बांधलेली आहे. त्या दोरीच्या सहाय्याने हा तरुण एडव्हेंचर करणार असतो, परंतु त्याच्यासोबत काही भलतंच घडतं.

जेव्हा ही व्यक्ती डोंगराच्या कड्यावरुन उडी मारते तेव्हा त्याला वाटतं की, तो त्या दोरीच्या मदतीने हवेत वर उडेल, परंतु तसे अजिबात होत नाही. उलट त्याचा तोल ढासळतो आणि तो खाली कोसळतो आणि दगडावर जोरात आदळतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Climb World (@climb_worlld)

हा व्हिडीओ पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की, या तरुणाला किती दुखापत झालेली असावी. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओला climb_worlld नावाच्या सोशल मीडीया अकाउंटवरुन सामायिक करण्यात आला आहे. या व्हिडाओला 1.5 लाखापेक्षाही जास्त लाईक्स आणि व्ह्यूव्स मिळाले आहेत. नेटकरी या व्हिडीओवर जोरदार कमेंट्स करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *