। नमस्कार ।
अनेकदा समाज माध्यमांवर अनेक प्रकारचे व्हिडिओ वायरल होत असतात. जे सर्वांनाच चकित करणारे असतात. अनेकदा तर हे व्हिडिओ असे असतात जे पाहून पहिल्या नजरेत तर तुमचा त्यावर विश्वासच बसणार नाही.
सध्या असाच एक समाज माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही चकित व्हाल. व्हिडिओमध्ये दिसेल की एक आंधळा शेफ असं काही करतो, जे पाहून भलेभले प्रोफेशनल कूक सुद्धा चकित होतील.
तुम्ही पाहिलच असेल आणि तुम्हीसुद्धा किचनमध्ये चाकूचा वापर अतिशय सावधगिरी बाळगून करतात. जेणेकरून भाज्या कापताना स्वतः सोबत काही दुर्घटना घडू नये.
मात्र कूक जर अंध असेल तर? अशा वेळी किचनमध्ये त्याच्यासोबत काम करणारे इतर त्याचे सहकारी त्या अंध व्यक्तीला भाजीपाला कापण्यापासून नक्कीच लांब ठेवतील नाही तर ठेवतीलच. मात्र सध्या एका अंध असलेल्या कूकचा व्हिडिओ समोर आला आहे. त्याचा भाजी कापण्याची कला पाहून सगळेच चकित झाले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की हा कुक आधी काकडी हातात घेतो आणि काकडीच्या वरील साल काढून तो आतील भाग वेगळा करतो. तो यानंतर अतिशय सहज 1 , 2 सेकंदातच लहान लहान भागात त्या काकडीचे तुकडे करतो.
सोशल मीडियावर लोक या कूकची ही कला बघून चकित झाले आहेत. यूजर्स त्यावर कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका यूजरनं या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना लिहिलं, की अशा प्रकारची कलाकारी दाखवण्यासाठी खूपच अनुभवाची आवश्यकता असते.
आणखी एका यूजरनं लिहिलं, दुसऱ्या बाजूच्या साथीदाराने त्याची मदत करायला हवी. अन्यथा काहीतरी विपरीत ही घडू शकते. आणखी एकानं लिहिलं की मला तर हा व्हिडिओ पूर्णपणे एडिटेड वाटत आहे. इतरही अनेकांनी व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हा हैराण करणारा व्हिडिओ फेसबुक यूजर Ikbal Khanने आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केला आहे. बातमी देईपर्यंत 34 मिलियनहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.