मुलाच्या अंगावर भिंत कोसळत असल्याचं दिसताच ढाल बनून उभी राहिली आई..; बेस्ट विडिओ होतोय वायरल

। नमस्कार ।

जगातील प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे माहित आहे, की कोणाचीही आई आपल्या लेकराला संकटातून बाहेर काढण्यासाठी कोणत्याही परिस्थितीचा सामना करू शकते. याच कारणामुळे अनेकदा आपल्या कानावर अशा घटना ऐकायला मिळतात, की आईनं आपल्या मुलाला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धो’क्यात घातला. सध्या अशीच एक घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे. हा व्हिडिओ पाहून पुन्हा एकदा एकच गोष्ट सिद्ध होत आहे, की आईची माया सगळ्यात मोठी असते.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अस दिसत आहे , की एक महिला आपल्या लहान मुलासोबत भिंतीच्या बाजूला बसलेली होती. आणि  तिला अचानक जाणवतं, की काहीतरी अनपेक्षित घटना घडणार आहे. इतक्यात अचानक ही भिंत कोसळू लागते. आणि त्या भिंतीच्या विटा महिलेच्या अंगावर पडतात. मात्र, महिला आपल्या मुलाला अजिबात धक्का लागू देत नाही.

व्हिडिओमध्ये दिसतं, की यानंतर लगेचच एक व्यक्ती इथे पोहोचतो. तो मुलाला उचलून घेतो. यानंतर महिला उठते आणि तिथून निघून जाते. हा व्हिडिओ कधी आणि कुठे शूट केला गेला आहे, याची नेमकी माहिती मिळालेली नाही. मात्र, हा व्हिडिओ पाहून सगळे हेच म्हणत आहेत, की एक आई आपल्या मुलांसाठी सुपरवुमनपेक्षा कमी नाही.

हा व्हिडिओ भारतीय वन अधिकारी सुशांता नंदा यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं – या जगाला मातांची गरज आहे. हा व्हिडीओ शेअर होताच लोकांनी मोठ्या प्रमाणात आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला सुरुवात केली. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, एका वापरकर्त्याने म्हटलं की खरोखरच आईसारखा धाडसी दुसरा कोणी असू शकत नाही. हा व्हिडिओ अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

बघा विडिओ :- 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *