‘मुंबई मेट्रो’ च्या ट्रॅक च्या बाजूला अडकली घार; मुक्या जीवाचा सुटकेचा थरार, पाहा वायरल VIDEO

। नमस्कार मित्रांनो ।

विजेच्या किंवा ट्रेनच्या तारांना अडकून कित्येक पक्ष्यांचे प्राण गेल्याच्या घटना तुम्ही पाहिल्या आणि ऐकल्या असतीलच. अशीच एक घार मुंबईत आपल्या जीवनमृत्यूशी झुंज देत होती. पण ती विजेच्या तारांना नव्हे तर मुंबई मेट्रोच्या ट्रॅक च्या बाजूला असलेल्या भिंतीवर अडकली होती. मुंबई मेट्रोच्या ब्रीजला अडकलेली ही घार दिवसभर सुटकेसाठी धडपड करत राहिली. या मुक्या जीवाच्या सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओही आता सोशल मीडियावर वायरल होतो आहे.

मुंबईच्या लोकल ट्रेननंतर आता मुंबई मेट्रो सुद्धा आता मुंबईकरांसाठी खूपच महत्त्वाची झाली आहे. कित्येक मुंबईकर दररोज मेट्रोतून प्रवास करत असतात. पण याच मुंबईच्या मेट्रो स्टेशनच्या आवारात एक घार अडकली होती. मुंबई मेट्रो 7 मार्गातील ही घटना आहे. कांदिवली पूर्वमधील आकुर्ली मेट्रो स्थानकावर एक घार मेट्रो ट्रॅकच्या बाजूला अडकली होती.

आपले पंख फडफडवत तिथून आपला जीव वाचवून पाळण्यासाठी ती अतोनात प्रयत्न करत होती. पण तिला ते शक्य होत नव्हतं. मेट्रो प्रशासनाचं तिच्याकडे लक्ष गेलं. पण त्यावेळी मेट्रो ट्रेनची ये-जा सुरू असल्याने काही करता येणं शक्य नव्हतं. मेट्रो कामकाजाच्या वेळेत बचावकार्य करणं धोक्याचं होतं.

तशी घार अशा ठिकाणी अडकली होती, जिथे तिला मेट्रो गेली तरी धोका नव्हता. त्यामुळे मेट्रो प्रशासनाने रात्री शेवटची मेट्रो जाईपर्यंत प्रतीक्षा केली.

मेट्रो प्रशासनाने वाइल्ड वर्ल्ड वेल्फेअर फाऊंडेशनला बोलावलं. अखेर संस्थेची टीम तिथं आली आणि घारीच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू झाले. बराच तास प्रयत्न केल्यानंतर अखेर या प्रयत्नांना यश आलं. घारीची सुखरूप सुटका झाली.

महामुंबई मेट्रो कॉर्पोरेशनने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या घारीला गंभीर दुखापत झाली नसल्याची माहितीही प्रशासनाने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *