माझा मुलगा आहे म्हणून सांगण्याची मला लाज वाटते, मी एक अपयशी बाप आहे..! पहा ड्र’ग्स प्रकरणात मुलाला पकडल्यानंतर त्याचा बापच…

सामाजिक जाणीव…

१८ ऑगस्ट २०१४ रोजी चॅनला म्हणजेच ऍ’क्शन चित्रपटाचा बादशहा दस्तुरखुद्द जॅकी चॅन च्या मुलाला १४ ऑगस्ट रोजी बीजिंग पोलिसांनी ड्र’ग्स बाळगल्यामुळे अटक केली होती. सोबत तैवानी अभिनेता काई को सुद्धा होता. चॅनच्या अपार्टमेंटची झ’डती घेतल्यानंतर पो’लिसांना  3 औंसहून अधिक अ’म्लीपदार्थ सापडले होते.

थोड्याच वेळात, जॅकी चॅनने आपल्या मुलाच्या ड्र’गच्या वापराबद्दल जाहीर माफी मागितली होती. तेव्हा जॅकी चॅन म्हणाला होता की, “माझ्या मुलाच्या कृत्याची मला लाज वाटते. एक बाप म्हणून हे माझे अपयश आहे आणि मी त्याच्या संरक्षणासाठी कुठलाही ह्यात हस्तक्षेप करणार नाही. कारण आज तो वाचेल पण त्याच्या सवयी बदलण्यात मला परत अपयश आले तर, तो अजून कुणाला ह्याच्या नादी लावायची शक्यता आहे.”

जॅकी चॅनच्या मुलाला ड्र’ग्सच्या गु’न्ह्यात तु’रुंगवास भोगावा लागला होता. नंतर त्याच्या मुलानेही याबद्दल जाहीर माफी मागितली. त्यात तो म्हणाला होता की, “आपण केलेले कृत्य चुकीचे असून,केलेल्या कृत्याला कुठल्याही प्रकारची सहानुभूती अथवा माफी नाही; म्हणून मी शिक्षा भोगून आलोय. ह्यापुढे असं कृत्य कधीही माझ्या हातून घडणार नाही.”

जॅकी चॅन आणि त्याच्या मुलाच्या ह्या कृत्याने जगापूढे एक ‘समाजाप्रती असणाऱ्या जाणीवेचं” उदाहरण स्थापित केलं. जॅकी चॅनच्या मुलाचं ड्र’ग्स घेणं, जवळ ठेवणं आणि वाटप करणं समर्थनीय नाहीच … परंतु त्यानंतर त्याच्या वडिलांचं आणि त्याच्या स्वतःच ह्याला प्रतिसाद देणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

कारण ‘तुम्ही कितीही मोठ्या बापाचे सुपूत्र असले तरी कायद्यापुढे सगळे समान असतात ‘ही भावना त्यांच्या कृत्यातून प्रदर्शित होते. आणि म्हणूनच , कदाचित त्यांच्या ह्या कृत्यामुळे का होईना अनेक तरुणांचं चुकीच्या मार्गावर जाणं थांबल असावं अशी वेडी अशा बाळगायला हरकत नाही. कारण आपण फक्त अशेवर जगणारी माणसं..

पण हे छान छान , आदर्श बिदर्श झालं विदेशात…

आपल्याकडे काय ???

आपल्याकडे परवा एका राजसुमाराला ड्र’ग्स घेतल्या,बाळगल्या म्हणून पो’लिसांनी पकडलं आहे..
पण इकडे त्याच्या बद्दल सहानुभूतीची लाट आलीये लाट. देशात हजारो वा’ईट घट’ना घडल्या पण तोंडातून एक शब्द न काढणारे आज – “बच्चा है ।”, अजून काय तर त्याला मुद्दाम पडकलं…

काही येडे पंखे तर त्याच्या घराबाहेर “we are with you king khan in this tough time” अस लिहीलेले पोस्टर्स घेऊन उभे आहेत. ‘ड्र’ग्स बाळगणे , से’वन करणे’ असे काय काय आ’रोप असलेल्या आ’रोपीचं पकडलं जाणं ‘टफ टाईम’ असू शकतो ?

जर असेल टफ टाईम तर नक्कीच ह्या पोस्टर वाल्यांची पण एकदा चौ’कशी व्हायला हवी. कारण कदाचित हेच त्याला ड्र’ग्स पुरवत असावे. (नाही आपला एक संशय म्हणून म्हंटल)

आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक जण म्हणाला, “आर्यन कशाला ड्र’ग्स विकेल ??? त्याच्याकडे इतका पैसा आहे की, तो ते क्रूझ विकत घेऊ शकतो.” ( अहो, त्या जॅकी चॅन कडे इतका पैसा आहे की, तो ते मन्नत का काय त्याच्यासहित आर्यनच्या बापाला ४ वेळा विकत घेऊन ८ वेळा विकू शकतो ते पण “लॉस” मधे…

पण कदाचित आपल्या उपस्थितमुळे को’र्ट आणि पो’लिसांच्या कामावर परिणाम होईल म्हणून जॅकी चॅन आपल्या मुलाच्या के’सच्या वेळी को’र्टात उपस्थित सुद्धा राहिला नव्हता. कारण होतं मुलाच्या हातून घडलेला आसमर्थनीय गु’न्हा. )

तळटीप :  कोर्टात केस अजून सुरू आहे, तुम्ही त्याला गु’न्हेगार म्हणत आहात हे चुकीचे आहे… असे म्हणणारे शाहरुखचे पंखे खूप आहेत. त्यांच्यासाठी – आर्यन खान वरील गु’न्हा अजून सिद्ध झाला नसला तरी, त्याने ड्र’ग्स सेवन केल्याचं मान्य केलं आहे आणि त्याने केलेल्या कृत्याचे समर्थन होऊच शकत नाही. आणि ह्याबद्दल त्याच्या पिताश्रींची (समाजात काही लोकं त्यांना रोल मॉडेल मानतात ) सामाजिक संदेश देणारी जॅकी चॅन सारखी कुठली प्रतिक्रिया सुद्धा आली नाही म्हणून हा लेखन प्रपंच…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *