l नमस्कार l
सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे ज्याचा उपयोग आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती दैनंदिन जीवनात करतो. ज्यावर आपण आपले मनोरंजन करण्यासाठी काही ना काही व्हिडीओ पाहत असतो. सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी आपले मनोरंजन करतात तर काही व्हिडीओ हे आपल्या अंगावर काटा उभा आणणारे असतात.
हा व्हिडिओ सोशल मीडिया वर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. तुम्ही विडिओ मध्ये पाहू शकता की ,माकड आणि किंग कोब्रा यांच्यातील जोरदार भांडणाचा एक व्हिडिओ इंटरनेटवर समोर आला आहे आणि तो व्हायरल होत आहे.
सुमारे दोन मिनिटांचा हा व्हिडिओ भारतीय वन सेवेचे अधिकारी सुशांत नंदा यांनी ३ जून रोजी ट्विटरवर शेअर केला होता. किंग कोब्रा माकडावर हल्ला करण्यासाठी पुढे येतो आणि माकड त्याच्याशी कसे भांडते, हे व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, कोब्रा अचानक माकडाच्या समोर येतो आणि त्याच्यावर हल्ला करायला लागतो.
माकड त्याचा सामना करतो. नागाने हल्ला केल्यावर माकडानेही हुशारीने प्रत्युत्तर दिले. ही लढत सुमारे २ मिनिटे चालली.
माकडाच्या धूर्ततेने अखेर त्याला वाचवले. माकडाने नागाच्या मागे जाऊन त्याची शेपटी पकडली. कोब्रा अनेक वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता, पण माकडाने त्याचा हल्ला हाणून पाडला. अखेर कोब्रा निसटला आणि माकड तिथेच उभं राहिलं. या प्रकरणात, शेवटी माकडाचा विजय झाला.