माकडाचा जीव वाचवताना झाला कारचा भीषण अपघात , धडकी भरवणारा विडिओ वायरल

। नमस्कार ।

शिमला : हिमाचल प्रदेश मधील शिमला येथून एका कारचा भीषण अ’पघाताचा व्हिडिओ वायरल होत आहे. एका माकडाचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात कार रस्त्यावरुन कित्येक फूट खाली कोसळली. हा संपूर्ण घटनेचा व्हिडिओ कॅमेरा मध्ये कैद झाला आहे.

तो विडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिमला मधील स्थित असलेल्या हॉटेल हिमलँडच्या पार्किंगमध्ये हा अपघात झाला होता. त्या हॉटेलमध्ये लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या संपूर्ण अपघाताचा व्हिडिओ रेकॉर्ड झाला.

व्हिडिओमध्ये कार एलिव्हेटेड रोडवरून घसरुन खाली पार्किंगच्या ठिकाणी आपटल्याचे दिसून येत आहे. कारच्या समोर अचानक एक माकड आले, चालकाचे त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

ही घटना घडण्याच्या दरम्यान तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी कारमध्ये अडकलेल्या लोकांची मदत केली. गाडीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात त्यांना यश आले. कारमध्ये एकाच कुटुंबातील तीन जण होते, त्यात एका 4 वर्षांच्या मुलाचासुद्धा समावेश होता. सुदैवाने, अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाही, सर्वजण थोडक्यात बचावले. कार दिल्लीहून रामपूरला जात होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *