कर्नाटकातील माकडांपासून कॉफी आणि सुपारी या पिकांचे संरक्षण करण्यासाठी शिवमोगा जिल्ह्यातील काही चतुर शेतकऱ्यांनी पाळीव कुत्र्यांचे वाघात रुपांतर केले.
होय हे खरे आहे. नल्लूरू गावचा रहिवासी श्रीकांत गौडा म्हणाला की त्याने आपल्या कुत्र्यांना वाघ बनविले आहे. तो म्हणतो की यापूर्वी त्याने वाघासारखी खेळणी देखील वापरली पण काही उपयोग झाला नाही.
त्याच्या म्हणण्यानुसार तो गोव्याला गेलेला तेथून त्याने वाघासारख्या खेळण्यांसाठी मागणी केल्याचे त्याने सांगितले.
परंतु काही दिवसांनंतर त्यांचा रंग फिकट पडला आणि संपूर्ण पिके खराब करायला माकडे परत आलीत.
त्यानंतर त्याला त्याच्या पाळीव कुत्र्यांना वाघांसारखे चित्रित करण्याचा एक मार्ग सापडला. म्हणजे श्रीकांत त्याच्या कुत्र्याला वाघ बनवतो.

त्यासाठी त्याने त्याच्या कुत्र्याच्या अंगावर काळे पट्टे अश्याप्रकारे काढले ज्याने तो कुत्रा नव्हे तर ,वाघच वाटत होता. व्यवस्थित निरीक्षण केल्यावर लक्षात यायचे की हा कुत्रा आहे .
श्रीकांत म्हणाला, “मी दोनदा शेतात बुलबुल (पाळीव कुत्र्याचे नाव) नेतो.” एकदा सकाळी आणि पुन्हा संध्याकाळी. शेतात येणारी सर्व माकडे त्याला पाहून पळून जातात.

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आता माकडे शेतापासून खूप दूर राहतात. दरम्यान, श्रीकांत गौडा यांची मुलगी अनन्या म्हणाली की आता गावातील प्रत्येकजण तिच्या वडिलांचा विचार वापरून आपल्या पिकांचे संरक्षण करीत आहेत. आता शेतकरी निवांतपणे त्यांचे आयुष्य जगत आहेत.

माकडांमुळे खूप ठिकाणी पिकांचे खूप नुकसान होत आहेत. तरी नल्लूरु गावातील श्रीकांत गौडा या शेतकऱ्याच्या या युक्तीमुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो .
तरी तुम्ही हा संदेश जास्तीत जास्तीत शेतकाऱ्यांपर्यत पोहोचावा. त्यांचा फायदा हाच आपला फायदा .
धन्यवाद!!