महाभयंकर पुरातून कोकण सावरतंय; खेडमधील अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ, पुराच्या पाण्यात तुटलेल्या तारांचं केलं काम Watch Video

नमस्कार ।

महाराष्ट्रात पूर्ण पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यातच कोकणातील अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर येऊन त्या दुथडी येऊन वाहत आहेत. त्या पूर परिस्थितीतील हे दृश्य अंगावर काटा आणणारा होता. या मुसळधार पाऊस चालू असताना जगबुडी नदीला पूर आला होता आणि अजूनही ती पूर परिस्थिती कमी झालेली नाही.

या भीषण पूर परिस्थितीत महावितरणाच्या कामगारांनी वाहत्या खाडीच्या पात्रात बिघडलेली इलेक्ट्रिकल लाईन दुरुस्त केली आहे.

त्या महावितरणच्या कामगाराने जगबुडी नदीच्या भयंकर पूर परिस्थितीत असताना देखील तुटलेल्या तारांचं काम वाहत्या खाडी पात्रात पूर्ण केले आहे. महावितरणाचे शासकीय ठेकेदार नयन इलेक्ट्रिकलच्या टीमनं आपला जीव धोक्यात घालून खेडमधील खाडीपाट्यात रजवेल येथे ३३ केव्हीची तुटलेली ती वायर जोडून दुरुस्त केली आहे.

अंगावर काटा उभा राहणारे हे मदत कार्य सुरू होते. काही तास या धोकादायक पूर परिस्थिती मध्ये महावितरणच्या शासकीय टीमने ३० गावांचा खंडीत झालेला वीज पुरवठा सुरळीतपणे पुन्हा चालू केला आहे.

जगबुडी नदीला आलेली महापुरामुळे खेडमधील खाडीपट्टा विभागात ३० गावांचा संपर्क तुटला होता. त्यात ३३ केव्हीच्या विद्युत वाहिनीची तार तुटल्यानं वीज पुरवठा देखील खंडीत होता. मात्र अशा पूर परिस्थितीत महावितरणाचे शासकीय ठेकेदार नयन इलेक्ट्रिकल कंपनीच्या टीमने आपला जीव धोक्यात घालून वीजपुरवठा पूर्वत केला आहे. त्यांच्या या कामाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

बघा विडिओ :- 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *