|| नमस्कार ||
आम्ही तुम्हाला आज मध काढण्याची अशी पद्धत दाखवणार आहोत ज्यामध्ये मधमाशांना इजा होणार नाही.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तेथील एक आदिवासी मधमाश्यांच्या पोळ्यातून मध काढत आहे. येथील आदिवासी कुटुंबे अनेक शतकांपासून आजूबाजूच्या घनदाट जंगलातून मध काढत आहेत.
पण मध काढण्याची त्यांची पारंपारिक पद्धत आग लावायची आणि धूर करायची हीच होती. यामुळे मधमाश्या मारल्या जायच्याच. व त्याचबरोबर या पद्धतीमुळे केवळ स्थानिक जैवविविधतेलाच हानी पोहोचली नाही तर मधाच्या गुणवत्तेवरही परिणाम झाला. त्यामुळे या मधाला बाजारात चांगला भाव मिळू शकला नाही.
परंतु आता ही नवीन पद्धत वापरण्याचे बरेच फायदे आहेत. त्यामुळे मधाचा दर्जा टिकून असून त्याला बाजारात चांगला भाव मिळत आहे.
गडचिरोली हा महाराष्ट्रातील एक जिल्हा आहे, जो छत्तीसगडला लागून आहे. या भागातील ग्रामस्थांना मध काढण्याची नवीन पद्धत शिकवली होती, ज्याच्या मदतीने ते आता स्वतःची काळजी घेत आहेत.
या नवीन पद्धतीचा अवलंब करण्याचा फायदा गावकऱ्यांना होत आहे. मुख्य म्हणजे त्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळू लागला आहे.
आता ग्रामीण भागातील अनेकांना यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. आम्हाला आशा आहे की अधिकाधिक लोक ही पद्धत शिकतील आणि अवलंबतील,” असे गोपाल पालीवाल म्हणतात, ज्यांनी मध काढण्याची ही नवीन पद्धत शोधली.