मगरीने सिंहावर केला अचानक हल्ला , लढाईचा थरार कॅमेऱ्यात कैद , पहा शेवट काय झाला

। नमस्कार ।

सिंह आणि सिंहिणी या जंगलाच्या राजा राणी चा जंगलात वेगळाच धाक असतो. त्यांच्याशी सामना करण्याची ताकद जंगलात एकाही प्राण्यात नसते. त्यामुळे या राजा राणी पासून सगळेच दूर दूर राहतात. मात्र जंगलात हा प्राणी कितीही ताकदवर असला तरी पाण्यात मात्र मगरीच्या ताकदीपुढे सिंहालाही मान टाकावी लागते.

सोशल मीडिया च्या प्लॅटफॉर्मवर आजपर्यंत तुम्ही मगरीचे बरेच वायरल झालेले व्हि़डिओ पाहिले असतील. हे व्हिडओ अपलोड होता क्षणी चांगलेच व्हायरल जातात. सध्या असाच एक सोशल मीडियावर मगर आणि सिंहिणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एवढा खतरनाक आहे, की तुम्ही सुद्धा पाहून तुमचाही थरकाप उडेल.

व्हिडिओमध्ये मगर आणि सिंहिणीची लढाई चांगली जुंपलेली  पाहायला मिळतं. अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की सिंह किंवा चित्ता पाण्यात जाऊन मगरी सोबतच लढाई सुरू करतात आणि कधी हार होते तर कधी त्यांचा विजय ही होतो. मात्र अस दृश्य फारच कमी पाहायला मिळतं कारण पाण्यात मगरीशी पंगा घेणं म्हणजे मृत्यूच.

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओध्ये मगर सिंहिणीवर हल्ला करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकाल की सिंहिण तहान लागल्यामुळे पाणी पिण्यासाठी नदीच्या काठावर पोहोचते. यादरम्यान ती नदीच्या पाण्यात उतरून आरामात पोहयचा विचार तिच्या मनात येतो तेवढ्यातच मागून एक मगर तिच्यावर अचानक हल्ला करते. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे सिंहिण घाबरते त्यानंतर ती क्षणाचाही विलंब न करता  लगेचच सिंहिण मगरीच्या तावडीतून आपली सुटका करते आणि तिथून पळ काढते.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे सिंहिण आपला जीव मगरीच्या हल्ल्यातून वाचवते आणि पाण्यातून लगेचच बाहेर निघून पळ काढते. मगरीने ज्याप्रकारे सिंहिणीवर हल्ला चढवला आणि तिची मान पडकली, ते पाहून सिंहिणीचं मगरीच्या तावडीतून वाचणं अशक्य वाटत होतं.

मात्र सिंहिणीचं नशीब चांगलं असतं की ती मगरीच्या हल्ल्यातूनही वाचते आणि संधी मिळताच पळ काढते. हा व्हिडिओ wild_animals_creation नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *