। नमस्कार ।
मुंबई शहरातील लोअर परेल मधील ब्रिजवर अचानक एका व्यक्तीने आपल्या कारचा यू टर्न घेतल्याने अ’पघा’त झाला. झालेल्या अ’पघा’ताप्रकरणी त्या कार चालकाला पो’लिसांनी ता’ब्यात घेतले आहे. दोन बाईकस्वार तरुणांना या अपघातादरम्यान जीव गमवावा लागला. मुलाची तब्येत अचानक बिघडल्याची बातमी पत्नीने फोन करुन सांगितल्यानंतर घाबरुन घाईघाईत यु टर्न घेतल्याचा दावा कारचालक अमित कुमार याने केला आहे.
कार चालक अमित कुमारचा दावा काय :- अमित कुमार हा अंधेरी येथील एका हॉटेलमध्ये मॅनेजर या पदावर काम करतो. रात्रीच्या वेळी एका मित्राला भेटण्यासाठी तो लोअर परेल या भागातील फिनिक्स मॉलजवळ येत होता. त्यावेळी अचानक पत्नीचा फोन आला आणि मुलाची तब्येत बिघडल्याचे पत्नीने त्याला सांगितले. त्यामुळे त्याने घाबरुन लगेच तिथूनच यू टर्न घेतला आणि घाईघाईत घरी निघाला, असा दावा अमित कुमारने केला आहे.
सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून गाडी शोधली :- अमितने यू टर्न घेतला पण त्याच वेळी त्या पुलावरुन भरधाव वेगाने येणारी बाईक त्याच्या कारला धडकून हा अपघा’त झाला, ज्यामध्ये दोन जणांचा मृ’त्यू झाला आहे. कार चालक अमित कुमार हा अ’पघात झाल्यानंतर फरा’र झाला होता.
मात्र सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून पो’लिसांनी गाडी शोधून काढली आणि त्या कारचालकला अटक करण्यात आली आहे. एन एम जोशी मार्ग पो’लीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं होतं? ही अपघा’ताची घटना बुधवारी (२९ सप्टेंबर) रात्री लोअर परेल पश्चिमेकडील ब्रिजवर घडली होती. कार चालकाने ब्रिजवर अचानक वेगात यू टर्न घेतला. कार चालक अचानक वळल्याने दुचाकी चालक तरुण गोंधळात पडला. त्याने बाजूने आपली दुचाकी वळवण्याचा प्रयत्न केला. पण कारच्या मागचा भाग त्याला लागलाच. त्यामुळे दुचाकी कारसह फरफटत पुढे गेली होती. कार चालक न थांबता तसाच पुढे निघून गेला.
यावेळी दुचाकीवर असलेल्या दोघांचाही बळी गेला. 25 वर्षीय कृष्णा कुर्हाडकर याच्यासह आणखी एकाचा मृत्यू झाला, तर जखमी तरुणावर मुंबईच्या सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांकडून तपासात हयगय केला जात असल्याचा आरोप मयत तरुणांच्या संतप्त नातेवाईकांना केला होता.
पाहा व्हिडीओ :