बैलांना नदीवर पाणी पिण्यासाठी घेऊन गेला, बैल परत आले पण तो काही परतलाच नाही…

नमस्कार..

बैलाला पाणी पाजण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय युवकाचा गोदावरी नदीत बुडून करुण अंत झाल्याची ह्रदयद्रावक घटना जालन्यातील घनसावंगी तालुक्यात  घडली आहे. अवघ्या 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घनसावंगी तालुक्यातील भोगगाव इथं ही घटना घडली. या गावात राहणारे मुळे कुटुंबीयांचा मुलगा समर्थ शिवाजी मुळे (वय 15) हा आपल्या दोन बैलांना घेऊन गोदावरी नदीच्या पात्रात पाणी पाजण्यासाठी गेला होता. समर्थ हा दररोज बैलांना पाणी पाजण्यासाठी घेऊन जात होता. आज सुद्धा नियमितपणे तो गेला होता.

नदीपात्रात पोहोचल्यावर त्याने बैलांना पाणी पाजण्यासाठी सोडून दिले. पण त्याचवेळी समर्थचा पाय घसरला व नदीपात्रात पडला. नदीपात्रात वाळु उपशामुळे मोठे खड्डे झाले आहे. त्यामुळे समर्थला वरती येता आले नाही. त्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

नंतर बैल घरी परत आले परंतु, समर्थ परत न आल्याने कुटुंबातील सदस्यांनी त्यांचा शोध सुरू केला. गावात चौकशी केल्यानंतर तो कुठेच आढळून आला नाही. त्यानंतर मुळे कुटुंबीयांनी बैलांना ज्या ठिकाणी पाणी पाजले त्या नदीपात्राकडे धाव घेतली असता समर्थचा मृतदेह गोदावरी नदीपात्रात आढळून आला. समर्थचा मृतदेह आढळून आल्यामुळे कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. वयाच्या अवघ्या 15 वर्षी त्याचे समर्थ सोडून गेल्यामुळे मुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.या घटनेमुळे भोगगाव गावी शोककळा पसरली आहे. पोलिसांनी अकास्मात मृत्यूची नोंद केली आहे.

दरम्यान, जालन्यातील हातवन येथील पाझर तलाव गेल्या पाच-सहा दिवसांपासून सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे अखेर फुटल्याने शेकडो हेक्टर शेत जमिनीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पंधरा वर्षांपूर्वी बांधकाम झालेल्या या पाझर तलाव आला नावाच्या प्राण्याने पोखरले होतं.

गतवर्षी या पाझर तलावाला गळती लागली होती तेव्हापासूनच सदरील पाझर तलावाचे पक्के काम व्हावे अशी ग्रामस्थांची मागणी होती. प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष करून तात्पुरत्या स्वरूपात जेसीबीच्या साह्याने बाजूला नाली करून पाझर तलावातील पाणी काढून दिले. पाझर तलावाला गळती लागल्यामुळे विनायक आटोळे संजय आटोळे, राजू आटोळे दौलतखान पठाण यांच्यासह बहुतांश शेतकऱ्यांच्या शेत जमिनीतील रब्बी पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *