किंग कोब्राचा व्हिडिओ :- या व्हिडिओमध्ये शूजच्या आत एक धोकादायक किंग कोब्रा कसा लपलेला आहे हे पाहिले जाऊ शकते. पुढे काय झाले याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही.
साप पाहताच बहुतेक लोक घाबरायला लागतात. अनेकांची अशीही इच्छा असते की त्यांना आयुष्यात कोणताही साप भेटू नये. पण कधी कधी इच्छा नसतानाही साप दिसतात. घरातील कोणत्याही वस्तूमध्ये साप लपला असेल आणि अचानक तो तुम्हाला दिसला तर वातावरण कसे असेल याची कल्पना करा.
तुमच्या मनात नक्कीच भीती असेल. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहाल की घरात ठेवलेल्या बुटात किंग कोब्रा लपलेला आहे. ते दिसताच घरातील सर्व सदस्य हादरून गेले.
शूजमध्ये लपला होता कोब्रा :- सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये घरात ठेवलेले शूज आणि चप्पलचे वॉर्डरोब दिसत आहे. त्याच्यावर अनेक शूज दिसत आहेत. त्यापैकी एकामध्ये एक धोकादायक किंग कोब्रा लपला होता.
कुणाचा विश्वास बसणार नाही, अशा पद्धतीने तो बसला आहे हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. पण घरातील कोणीतरी त्याच्यावर नजर टाकली आणि ट्रेनरला बोलवलं. नंतर तिथून साप काढला गेला.
You will find them at oddest possible places in https://t.co/2dzONDgCTj careful. Take help of trained personnel.
WA fwd. pic.twitter.com/AnV9tCZoKS— Susanta Nanda IFS (@susantananda3) July 11, 2022
दृश्य पाहून आश्चर्यचकित व्हाल :- या व्हिडीओमध्ये जो प्रकार पाहायला मिळत आहे, ते पाहून अनेकांच्या झोपा उडाल्या आहेत. हा व्हिडिओ IFS अधिकारी सुसंता नंदा यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, “पावसाळ्यात तुम्हाला हे घरातील विचित्र ठिकाणी आढळतात.
सतर्क रहा. प्रशिक्षक लोकांची मदत घ्या.” ५३ सेकंदांच्या या व्हिडिओला आतापर्यंत दीड लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.