बाबो… माणसापेक्षा सुद्धा हुशार आहे ही गाय… पहा पाणी पिण्यासाठी आणि पिऊन झाल्यावर काय केलं…

। नमस्कार ।

गेल्या काही वर्षांपासून आपण हे सातत्यानं ऐकत आलो आहोत की, भारत अतिशय झपाट्यानं शून्य दिवसाच्या जवळ जात आहे. शून्य दिवस म्हणजे असा दिवस ज्या दिवशी आपल्याकडील नैसर्गिक जलसाठे पूर्णपणे संपलेले असतील. हा भयानक दिवस पहायचा नसेल, तर पाण्याचा एकएक थेंब वाचवणं गरजेचं आहे.

हाच एक पाणी जपून वापरण्याचा संदेश या मुक्या गाईने आपल्या सर्वांनाच आपल्या या कृतीतून दिला आहे. सोशल मीडियावर सध्या या गायीचा व्हिडीओ जाम व्हायरल होत आहे. ही गाय आपल्या शिंगांनी नळ उघडून पाणी पिते आणि पाणी पिऊन झाल्यावर व्यवस्थितरीत्या नळ बंद सुद्धा करते.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, तहान लागलेली असताना सुद्धा ही गाय अतिशय समजदारीने वागतेय. जोपर्यंत नळाला पाणी येत नाही तोपर्यंत ही गाय आपल्या शिंगाने नळाची तोटी फिरवत पाणी काढण्याचा प्रयत्न करतेय.

नळातून पाणी आल्यानंतर ही तहानलेली गाय घटघटा पाणी पिताना दिसून येतेय. पाणी पिऊन आपली तहान भागवून झाल्यानंतर कोणत्या क्षणाचाही विलंब न करता  या गायीने लगेचच नळाची तोटी बंद करते. हे खरंच पाहण्यासारखं आणि तीच मानवाने अनुकरण करण्यासारखं आहे.

Jamie Gnuman197 नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ सामायिक करण्यात आला आहे. त्यानंतर गायीचा हा व्हिडीओ समाज माध्यमांवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या व्हिडीओला पाहणाऱ्यांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे. पाणी कस वाचवावे हा संदेश गोमातेने आपल्याला दिला आहे, अशी प्रतिक्रिया काहीजणांनी दिली.

बुद्धी आणि विचार करण्याची कुवत असलेल्या माणसांनाही जे जमत नाही ते या मुक्या गायीने कृती करून दाखवलं आहे. पाणी वाया घालवू नका हा आपल्या पूर्वज लोकांनी दिलेला कानमंत्र आपण किती मनावर घेणार हा मात्र प्रश्न आहे. भारतामध्ये अनेक शहरात पाणी टंचाई निर्माण होत आहे त्यात आपण या गायीचं अनुकरण करायला हवं आणि पाणी वाचवायलाच हवं.

हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला. या व्हिडीओला शेअर केल्यानंतर काही मिनिटातच वाऱ्यासारखा सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओवर नेटिझन्सनी पाणी वाचवा हा संदेश देणाऱ्या या गायीवर कौतुकाचा वर्षाव सुरू केलाय.

आपण अनेकदा असं म्हणतो, माणसांपेक्षा प्राणी बरे असतात. पण याची प्रचिती प्रत्यक्षात या व्हिडीओमधून मिळालीय. पाण्याचं महत्त्व माणसाला समजलेलं नाही, पण प्राण्यांना समजलेलं आहे. यातून माणसाने शिकणे गरजेचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *