। नमस्कार ।
सोशल मीडियावर सध्या अनेक प्रकारचे विडिओ वायरल होताना दिसतात. त्यात काही विडिओ मजेशीर असतात तर काही हृदयाचा ठोका चुकवणारे तर काही मनाला स्पर्श करणारे.
कोणत्याही स्त्रीसाठी प्रसुती कळा सुरू झाल्यापासुन तिच्या बाळाला जन्म देईपर्यंतचा काळ खुपच वेदनादायक असतो. अशावेळी योग्य त्या सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत तर खूपच गंभीर परीस्थितीशी सामना करावा लागू शकतो. सोशल मीडियावर एका गर्भवती महिलेचा video जास्तच व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहु शकाल की गर्भवती महिलेला घेऊन जात असणारी एक रिक्षा रस्त्यातच पंक्चर होते. रिक्षा अचानक मधेच बंद झाल्यामुळे रिक्षा चालक इतर जाणाऱ्या वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न करतो. जेणेकरून त्या वेदना सहन होत नसलेल्या या महिलेला लवकरात लवकर रुग्णालयात पोहोचवता येईल.
असा तिथे बराचवेळ गाड्यांना थांबवण्याचा प्रयत्न करूनही कोणीही गाडी थांबवली नाही. नंतर एक BMW मागच्या दिशेने येत होती. या कारमधुन बाहेर आलेल्या एका शाळकरी मुलीनं त्या ताई ला मदतीचा हात दिला. या चिमुरडीचा रुग्णालयात जाण्यास केलेल्या मदतीचा video सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.
हा video सीसीटीव्ही फुटेजमधील क्लिप असल्याचे आपल्याला दिसत आहे आणि त्यात रेकॉर्डिंग बटण,वेळ,तारीख सर्व दिसत आहे.तमिळ न्युज वेबसाइट्सने हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ‘माणुसकी अजुनही शिल्लक आहे’ या मथळ्यांसह घटना लोकांसमोर मांडली आहे.
humanity still alive❣️ pic.twitter.com/vemGhZCqp8
— PandeyG (@MrPandeyG) December 7, 2021
ही घटना एक माणुसकीच जीवंत उदाहरण आहे आणि प्रसुती वेदनांनी व्हीवळत असलेल्या एका महिलेसाठी BMW कारमध्ये असलेल्या चिमुरडीनं धाव घेतली. ती शाळकरी लहान मुलगी,देवीच्या रूपात दिसुन आल्याचं त्यांनी म्हटलंय.