। नमस्कार ।
गेल्या चार पाच दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पाऊस पडत होता. या मुसळधार पावस लागल्यामुळे नदी-नाले ओसंडून वाहत होते आणि अनेक ठिकाणी पूर परीस्थिती निर्माण झाली होती.
नाशिक जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला होता. पावसाचं हे थैमान चालू असतानाच एका तरुणाने थेट पोहण्यासाठी वाहत्या पाण्यात उडी घेतली आणि हा प्रकार त्याच्या अंगलट आल्याचं पहायला मिळालं.
नाशिकमधील रामकुंड परिसरात हा तरुण पोहण्यासाठी वाहत्या पाण्यात उडी मारली. मात्र, पावसाच्या पाण्यामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह जास्त वाढत असल्याने तो वाहून जायला लागला होता. सुदैवाने त्या परिसरात उपस्थित असलेल्या जीवरक्षकांनी त्याला पाहिले आणि मदतीसाठी त्या पाण्यात उडी घेतली.
या तरुणाला 500 मीटर अंतरावर लाईफ गार्ड्सने बचावले आणि सुखरूप बाहेर काढले. ही घटना 28 सप्टेंबर रोजी घडली असून त्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
पोहण्याचे धाडस अंगलट; पुराच्या पाण्यात गेला वाहून pic.twitter.com/CB5fCbDHFv
— News18Lokmat (@News18lokmat) September 29, 2021