नमस्कार…
आपल्याला ट्राफिक पोलिसांचे विडिओ हल्ली जास्तच वायरल होताना दिसत असतात. ट्रॅफिक हवालदार आणि वाहनचालक यांच भांड’ण आपल्याला काही नवीन नाही. या वादातून भां’डण, हा’णामा’री झाल्याच्याही घटना बऱ्याचदा घडल्या आहेत.
कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात तर पोलीस आणि सर्वसामान्य लोकांच्या भां’डणाचे कित्येक व्हिडिओ व्हायरल झालेले आपण पाहिले असेलच. सध्या अजूनही राज्यात काही नि’र्बंध लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे अजूनही पोलिसांसोबत सामान्य जनतेचा वा’द होतोच.
सध्या सोलापूरा शहरातील असाच एक ट्रॅफिक पोलीस आणि एका वाहनचालकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ती व्यक्ती आपल्या दुचाकीवरुन सिलेंडर गॅस घेऊन जात होती. तेव्हा त्या दुचाकीस्वाराजवळ ट्रॅफिक हवालदाराने पैशांची मागणी केली होती. त्यामुळे, त्या दुचाकीस्वाराने चक्क मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटाप्रमाणे गांधीगिरी करत अंगावरील सगळे कपडे उतरवले होते.
सोलापूर शहरातील सातरस्ता परिसरातील पत्रकार भवन येथे ही गोष्ट घडली आहे. त्या ट्राफिक हवालदाराने त्याला अडवून पैशांची मागणी केल्याने त्या ट्राफिक हवालदारामध्ये आणि नागरिकामध्ये शाब्दीक वाद झाला. त्यानंतर, पीडित व्यक्तीने अंगावरील सर्व कपडे काढून रस्त्यावरच न’ग्न झाल्याचं व्हिडिओत दिसत आहे.
त्यानंतर, त्या ट्राफिक हवालदाराने घटनास्थळावरुन पळून गेला. ती व्यक्ती शहरातील गॅस गोडावूनमधून गॅस सिलेंडर घेऊन घरी परतत होती. त्यावेळी, ट्राफिक पोलिसाने दुचाकीस्वारास हटकले व मास्क नसल्याचे कारण सांगत पैशांची मागणी केली. त्यावेळी, मास्क घालेन नाहीतर कपडे काढून फिरेन तुम्हाला काय करायचंय, असा प्रतिप्रश्न व्यक्तीने केला.
त्यावेळी, तेथे उपस्थित ट्राफिक हवालदाराने पण कपडे काढा नाहीतर काहीही करा, पण मास्क नसेल तर पावती फाडा, अशी भूमिका धरून ठेवली होती. त्यानंतर, संबंधित व्यक्ती कपडे काढून न’ग्नावस्थेत रस्त्यावर उभा राहिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पोलिसांच नाव खराब होऊ नये म्हणून संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन सत्य काय आहे ते पडताळण्यात येईल. संबंधीत घटनेबद्दल रस्त्यावरील ट्राफिक पोलिसांकडेही चौकशी करण्यात येत आहे. त्या ट्राफिक हवालदाराने चौकशीत अवैध्यरित्या पैशांची मागणी केल्याचे सिद्ध झाल्यास कारवाई करण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली धाटे-घाडगे यांनी म्हटले आहे.
मात्र, प्राथमिक माहितीनुसार दुचाकीस्वाराने मास्क घातला नव्हता आणि दंडाच्या रकमेची मागणी केल्यानंतर उद्धट वर्तन केल्याचे सांगण्यात आले आहे, असेही धाटे यांनी म्हटले.