पूजा केली नाही तरीही होतील सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण….

। नमस्कार ।

ओम नमः शिवाय, बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की आपण दररोज विधिवत देवपूजा करावी अगदी षोडशोपचारे देवाची पूजा आपल्या घरात व्हावी. पण वेळेअभावी आजकालच्या धावपळीच्या जीवनात करणे शक्य होत नाही आणि काही लोकांना ऑफिसमध्ये जायचं असतं तर काहींना आपल्या दुकानात व्यवसायात वेळ द्यावा लागतो. तर अशावेळी शास्त्रांमध्ये जी विधियुक्त पूजा सांगितली आहे तिकडे शक्य होत नाही. त्यामुळे इच्छा असली तरी इतका वेळ आपल्याकडे उपलब्ध नसतो आणि आपली मजबुरी होते आणि आपल्या मनात अशी शंका येते की, आपण अशी पूजा करत नाही त्यामुळे आपल्याला सफलता मिळत नाही. आपल्या मनातील काही इच्छा आहे ते पूर्ण होत नाही.

हे तर अगदी खरंच आहे की, शास्त्रांमध्ये असे काही उपाय सांगितले आहे जेणेकरून आपण सफलता मिळवू शकतो आणि माता लक्ष्मीला प्रसन्न शकतो. पण वेळेअभावी जर तुम्हाला हे करणे शक्य नसेल, तर दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. अगदी मनोभावे या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. त्यामुळे संपूर्ण विधीवत पूजेचे फळ प्राप्त होईल. तुम्ही हा मंत्र दररोज सकाळी उठल्यानंतर देखील म्हणू शकता किंवा तुमची जी काही थोडीफार पूजा असेल ती झाल्यानंतर देखील तुम्ही या मंत्राचा उच्चार करू शकता, 1 वेळा किंवा 3 वेळा तुम्हाला जितका शक्य असेल तितक्या वेळा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे.

अगदी मनापासून या मंत्राचे उच्चारण करायचे आहे. मंत्र आहे की,
श्री राम राम रामेति, रमे रामे मनोरमे ।
सहस्रनाम तत्तुल्यं, रामनाम वरानने ॥
श्री राम राम रामेति, रमे रामे मनोरमे ।
सहस्रनाम तत्तुल्यं, रामनाम वरानने ॥

या मंत्राला श्रीराम तारक मंत्र असेदेखील म्हटले जातं, तर या मंत्राचा उच्चार आपल्याला दररोज सकाळी करायचा आहे. विष्णुसहस्त्रनामच्या पठणाने ते पुण्य आपल्याला प्राप्त होईल तेच पुढे आपल्याला या मंत्राच्या एकदा उच्चार केल्यानंतर होणार आहे. त्यामुळे अगदी मनोभावे या मंत्राचा जप आपण करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या दिनचर्येचा सुरुवात करायची आहे. तुम्हाला पूर्ण विधियुक्त पूजा केल्याचे पुण्य प्राप्त होईल.

पण मनात शंका आणू नका की, मी विधिवत पूजा केली नाही किंवा भगवान माझ्यावर प्रसन्न होतील की नाही, अशी शंका मनात न आणता आपण अगदी मनोभावे या मंत्राचा उच्चार करायचा आहे. भगवंताच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये सफलता आणि उन्नत येईलच आणि याचबरोबर माता लक्ष्मीचा देखील तुमच्यावर सदैव कृपा आशीर्वाद राहील. तर तुम्ही देखील दररोज या मंत्राचा जप अवश्य करा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *