। नमस्कार ।
बंगालच्या उपसागरात गुलाब नावाचं चक्रीवादळ निर्माण झालं होतं. त्यामुळे मागील चार दिवसांपासून राज्यात अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढलं होत. त्यामुळे अनेक नद्या आणि धरणं दुथडी भरून वाहू लागले आहेत.
तसेच नाशिक जिल्ह्यालाही अतीवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नाशक मधील रामकुंड येथे नदी दुथडी भरून वाहत आहे. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढताच रामकुंडावर तरुण पोहणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. याठिकाणी काही तरुण उंचावरून उड्या मारत जीवघेणी स्टंटबाजी करताना दिसत आहेत. या घटनेचा लाइव्ह व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल होतं आहे.
खरंतर, गेल्या काही तासांपासून संपूर्ण नाशिक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे गंगापूर धरण काठोकाठ भरलं होत. त्यामुळे गंगापूर धरणातून तीन हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तसेच नदीच्या काठावरील अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.
असं असताना काही तरुण मात्र रामकुंडावर पोहण्यासाठी पोहोचले आहेत. ते उंच इमारतीवरून नदीत जीवघेणी स्टंटबाजी करत आहेत. प्रशासनाचे कर्मचारी याकडे कानाडोळा करताना दिसत आहे. तरुणांच्या स्टंटबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल होतं आहे.
गेल्या काही तासांपासून जिल्ह्यातील अनेक धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे गंगापूर, दारणा, नांदूर-मध्यमेश्वर या सर्व धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. गंगापूर धरणातून 15 हजार क्यूसेक पर्यंत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे.
तर नांदूरमध्यमेश्वर धरणातून 25 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. परिणामी नदी काठच्या 220 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत पाण्यानं गाठली धोक्याची पातळी गाठली आहे.
नाशिकच्या रामकुंडावर पूरपरिस्थिती निर्माण होताच, पोहण्यासाठी तरुणांची गर्दी आणि जीवघेणी स्टंटबाजी #Nashik pic.twitter.com/tecEVmb2PN
— News18Lokmat (@News18lokmat) September 29, 2021
त्याचबरोबर दुतोंडया मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहचलं आहे. तर पटांगण भाजी मंडई पूर्णपणे पाण्याखाली जाऊन सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदी पात्रातील सर्व पुरातन मंदीरं आणि कुंभस्थान देखील पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे नदीतील पाण्याची वाढती पातळी लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे.