पुराच्या पाण्यात गाय वाहून गेली पण काही अंतरावरून पुन्हा ती काठावर परत आली , बघा कस ते

। नमस्कार ।

बुलडाणा जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. जिल्ह्यात ढगफुटी जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्यांनादेखील पूर आला आहे. त्याच पुराच्या पाण्यातून काही जनावरं वाट काढत सावरत जात होते. पण, अचानक जोर वाढला आणि काही जनावरं पाण्यात वाहून गेली. पण, काही अंतरावर दूर गेल्यावर गाय परत बाहेर आली.

बुलडाणा जिल्ह्यातील १३ ही तालुक्यात रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान खात्याने पावसाचा अंदाज दर्शविल्याप्रमाणे पावसाचा जोर वाढला आहे. खामगाव जवळच्या बोर्डी नदीला पूर आला आहे. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाणी इतके वाढले होते की, रस्त्या पाण्याखाली गेला होता.

लोकांची वाहतूक थांबली होती. पण, त्याचवेळी काही जनावरं ही पाण्यात उतरून रस्ता पार करत होती. एका पाठोपाठ गुरे पुराच्या पाण्यात चालू लागली. काही अंतरावर गेल्यानंतर पाण्याचा वेग इतका वाढला की जनावरं वाहून गेली.

पण, पुराच्या पाण्यात काही अंतर दूर केल्यानंतर एखाद्या चमत्काराप्रमाणे काही जनावरं पाण्यातून बाहेर आली. त्यानंतर लोकांनी जनावरांना अडवून ठेवलं. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. पण, पुराच्या पाण्यातून जनावरं बाहेर आल्याचे पाहून उपस्थितीत लोकांनी तोंडात बोटं घातली.

दरम्यान, जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांमध्येही पाणी साठा वाढला असून सर्वच जनजीवन विस्कळीत झालं आहे छोट्या मोठ्या नदी नाल्यांना पूर आल्याने अनेकांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात ढगफुटी जन्य परिस्तिथी निर्माण झाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

बघा विडिओ :-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *