आताच्या मॉडर्न जमान्यात एखाद्याला फेमस होण्यासाठी फक्त एक रात्रच पुरेशी असते. जर तुमच्याकडे एखादी कला , शैली असेल किंवा जर तुम्ही इतरांपेक्षा वेगळं काहीतरी केले तर तुम्हीही लगेच फेमस होऊ शकता. अशाच सोशल मीडिया चा आधार घेऊन एक आई आपल्या छकुलीचे व्हिडिओज प्रचंड वायरल होताना दिसत आहेत आणि ते विडिओ लोक आवडीने बघतात.
सोशल मीडियाच्या दुनियेत या मायलेकी रातोरात फेमस झाल्या असून आई प्रमाणेच छकुली देखील सुरात गाताना दिसून येत आहे. या ३ वर्षाच्या चिमुकलीने आजपर्यंत अनेक गाणी गायली असून तिची प्रत्येक गाणी व्हायरल होत असतात. २ वर्षाची असताना तर तिने चक्क “लग जा गले” हे गाणे गाऊन सर्वांना चकित केले होते.
View this post on Instagram
पश्चिम बंगाल येथे राहणाऱ्या या छकुलीचे नाव प्रज्ञा मेधा असून तिच्या आईसोबत ती गाणं गाताना दिसते. या दोघींचा २ महिन्या पूर्वीचा केदारनाथ चित्रपटातील “नमो नमो” हे गाणे गातानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर लाखो लोकांनी पाहिले आहे आणि लाईक सुद्धा केलं आहे.
इतक्या लहान वयात प्रज्ञाची स्मरणशक्ती व योग्य लागलेला सुर पाहून अनेकांना चकित करतात. ती फक्त बॉलिवूड चित्रपटांचीच गाणी गात नाही तर तिला जवळपास देवी देवतांचे जास्तीत जास्त मंत्र पाठ आहेत. तिला इतक्या लहान वयात कसली गाणी शिकवत आहेत, असे म्हणणाऱ्यांना ही एक चपराक आहे.या दोघींचे व्हिडिओ लाखो लोक पाहून शेअर करत असतात.
तुम्हाला या चिमुकलीची गाणी कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.