। नमस्कार ।
जन्मजात दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या पुण्याच्या वेदिकाने अनेक दिवस आपल्या आजाराशी खुल्या हाताने लढाई केली. वर्षाची चिमुरडी किती सहन करणार? पण आई-वडिलांचा आणि देशवासियांच्या पाठिंबा मिळाल्यामुळे वेदिका पुन्हा बागडू लागेल हे स्वप्न दिसू लागलं.
मात्र दुर्देवाने हे केवळ स्वप्नचं राहिलं. 1 ऑगस्ट रोजी वेदिका शिंदेला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यातच तिची प्राणज्योत मालवली.
तिच्या जाण्याने अख्ख्या देशाला मोठा धक्का बसला आहे. वेदिका Spinal Muscular Atrophy या जनुकीय आजाराने ग्रस्त होती. या आजारावर केवळ 16 कोटींचं इजेक्शन हा एकच पर्याय होता. वेदिकासाठी अख्खा देश एकत्र आला. अगदी राजकारण्यांपासून ते सिनेकलाकारांपर्यंत अनेकांनी मदतीचे हात पुढे केले आणि लोकांनाही मदतीचं आवाहन केलं.
असं सर्व करीत 16 कोटी जमा करण्यात आले आणि तिला बरं करण्यासाठी लागणारं इंजेक्शनही तिला देण्यात आलं होतं. 16 जून रोजी 16 कोटींचे इंजेक्शन वेदिलाला दिल्यानंतर नागरिकांच्या आनंदाचा पारावर उरला नव्हता. आता वेदिका बरी होताना लोकांना पाहायचं होतं.
दरम्यान वेदिका शिंदेच्या आई-वडिलांनी तिच्या गोड-गोंडस फोटो आणि व्हिडीओचं एक इस्ट्राग्राम अकाऊंटही सुरू केलं आहे. वेदिकाच्या मृत्यूच्या काही तासांपूर्वी त्यांनी वेदिकाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. यामध्ये वेदिका खेळताना दिसत आहे. दुर्देवाने हा व्हिडीओ शेवटचा ठरला आहे.
काय आहे या व्हिडीओत? :- या व्हिडीओमध्ये वेदिका खेळताना दिसत आहे. यात लिहिलं आहे की, आज बाबांनी मला एक बॉल दिला. हा बॉल मी घट्ट पकडू शकते. हे किती भारी आहे ना..गेल्या काही दिवसात मी बरी होत आहे. तुम्हा सर्वांसोबत खेळायची आतुरतेने वाट पाहतेय. माझी आजी माझ्यावर खूप प्रेम करते. ती नेहमी माझ्यासाठी गाणं गाते आणि मला ते खूप आवडतं. इतकं की गाणं सुरू झालं की मी टाळ्या वाजवू लागते..हो..मी टाळ्या वाजवते….मी स्टेरॉइडवर आहे पण एक चांगली बातमी म्हणजे माझा प्रतिसाद देण्याच्या कालावधीत कमालीची सुधारणा झालीये.
डॉक्टर म्हणाले थोडी थोडी सुधारणा आहे वेदिका..पण ऑक्सिजन लेवल कमी असल्या कारणाने आणि वातावरणातील बदलामुळे मला त्रास होतो. मला सतत ताप येत राहतो. माझे आई-बाब खूप काळजी करीत राहतात. उद्या ते मला न्यूरोलॉजिस्टकडे घेऊन जाणार आहे…
व्हिडीओच्या खाली लिहिलेला हा मजकूर वाचून तुम्ही अश्रू थांबवू शकणार नाही. वेदिका आपल्यात नाही, ही बाब अद्यापही मन मानण्यास तयार नाही.
वेदिकाला होता असाध्य आजार : वेदीका पाच महिन्यांची असताना तिला SMA टाईप-1, या जनुकीय आजारानं ग्रासल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यामुळे वय वाढण्याबरोरब तिच्या शरीरातील एक-एक अवयव निकामी होत होता.
त्यामुळे उपचार करणं अत्यावश्यक होतं. या आजारावर मात करण्यासाठी झोलगेन्स्मा (Zolgensma) ही एकमेव लस उपलब्ध आहे. पण या एका लशीची किंमत तब्बल 22 कोटी आहे. असं असताना वेदिकाच्या आई बाबानं तिला वाचवण्यासाठी जीवाचं रान केलं.
बघा विडिओ :-
View this post on Instagram