पाकिस्तानी प्लेयर ने दिल्या नीरज चोप्रा ला शुभेच्छा आणि अनोखा संदेश…

। नमस्कार ।

सध्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा सुरू आहेत. आणि त्यात आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू उत्तम कामगिरी बजावत आहेत. आजच भारताचा २३ वर्षीय भालाफेक खेळाडू नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे.

नीरजने भालफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पहिल्याच प्रयत्नात ८७.०३ मीटर तर दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटर दूरपर्यंत भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. या कामगिरीनंतर नीरजवर देशभरात कौतुकाचा वर्षाव होत आहे. हा कौतुकांचा वर्षाव होत असतानाच त्याचा प्रतिस्पर्धी या सामन्यात पदकासाठी मैदानात असणाऱ्या पाकिस्तानच्या अर्शद नदीमनेही खास शब्दांमध्ये नीरजचं कौतुक केलं आहे.

सामना संपल्यानंतर नदीमने ट्विटरवरुन स्वत:ला पदक न कमवल्याबद्दल आपल्या देशाची माफी मागितली आहे. पण त्याचबरोबर त्याने भारताच्या नीरजलाही शुभेच्छा दिल्यात. “माझा आदर्श असणाऱ्या निरज चोप्राला विजयाच्या शुभेच्छा. तसेच पाकिस्तानची मी माफी मागतो मला देशासाठी पदक जिंकता आलं नाही,” असं नदीमने म्हटलं आहे. नदीमचं हे ट्विट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

चेक रिपब्लिकच्या वडलेज आणि वेसेलीने अनुक्रमे रजत आणि कांस्य पदकावर नाव कोरलं. नीरजसह १२ स्पर्धक अंतिम फेरीत होते ज्यात नदीमचाही समावेश होता. वेबर (जर्मनी), वडलेज (चेक रिपब्लिक), वेटर (जर्मनी), कॅटकवेट्स (बेलारूस), मियालेस्का (बेलारूस), मारडारे (मोल्डोवा), वेसली (चेक रिपब्लिक), नोवाक (रोमानिया), इटेलाटालो (फिनलँड), अॅम्ब (स्वीडन) हे स्पर्धक अंतिम सामन्यात खेळले.

नदीम पाचव्या स्थानी… :- नदीमने नीरजला पाहूनच भालाफेकमध्ये आपलं करियर करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतं आहे. या स्पर्धेत अंतिम सामन्यामध्ये नदीम पाचव्या स्थानी राहिला. नदीमने ८४.६२ मीटर दूरपर्यंत भाला फेकला. नदीमच्या अगोदर जर्मनीचा वेबर ने चौथा क्रमांक पटकावला. वेबर ने ८५.३० मीटर दूरपर्यंत भाला फेकला.

नीरज यापूर्वी कोणत्या स्पर्धांमध्ये जिंकलाय? यापूर्वी नीरजने आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ, आशियाई चॅम्पियनशिप, दक्षिण आशियाई खेळ आणि जागतिक कनिष्ठ स्पर्धेत सुवर्ण पदके जिंकली आहेत. नीरज चोप्राने आपले भालाफेक कौशल्य सुधारण्यासाठी जर्मनीच्या बायोमेकॅनिक्स तज्ञ क्लाऊस बार्टोनिट्झ यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे. तेव्हापासून त्याच्या कामगिरीत सातत्य राहिले आहे.

१२१ वर्षांनंतर… :- ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट्स म्हणजे अॅथलेटिक्स हे कोणत्याही ऑलिम्पिक खेळांचे मुख्य आकर्षण असते, परंतु आजपर्यंत कोणत्याही भारतीयांनी या स्पर्धांमध्ये पदक जिंकले नाही. ब्रिटिश भारताकडून खेळत असलेल्या नॉर्मन प्रिचर्ड यांनी १९००च्या ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्समध्ये दोन पदके जिंकली होती, परंतु तो इंग्रज होता, भारतीय नव्हता. नीरजने भारताची १२१ वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *