l नमस्कार l
तुम्ही जर सोशल मीडिया युजर असाल तर, तुम्हाला माहीतच असेल की प्राण्यांच्या लढाईचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत असतात.सध्या असाच एक मांजर आणि उंदीर यांचा भांडणाचा व्हिडिओ सध्या वायरल होत आहे. जो पाहून असे तुम्हाला “टॉम अँड जेरी” कार्टूनची आठवण येईल.
तुम्हाला माहितीच असेल की हल्ली प्राण्यांमध्ये मांजरीचे अनेक व्हिडिओ वायरल होत असतात. टॉम अँड जेरी कार्टूनमध्ये जशी मांजर आणि उंदीर यांच्यातील दुष्मनी आहे तशीच अगदी खऱ्या आयुष्यातही असते हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे.
तुम्ही जर हे कार्टून कधी पाहिले असेल तर तुम्हाला माहितीच असेल यात जेरी नामक उंदीर टॉम म्हणजेच मांजराला खूप त्रास देत असतो. मात्र या कार्टूनमध्ये त्या दोघांमध्ये मैत्रीही असते असे दाखवलेले आहे, म्हणजे “तुझं माझं जमेना तुझ्यावाचून करमेना” सारखं , परंतु खऱ्या आयुष्यात थोडीच असं असतं.
खऱ्या आयुष्यात उंदीर आणि मांजर एकमेकांचे पक्के वैरी आहेत. पण जर तुम्हाला खऱ्या आयुष्यातले टॉम अँड जेरी सारखे मांजर आणि उंदीर दिसले तर नक्कीच आश्चर्य वाटेल. हो खऱ्या आयुष्यातले टॉम आणि जेरी व्हिडिओ पहा तुम्हालाही आश्चर्य वाटेल आणि हे खरं असल्याचं पटेल.
तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की, उंदीर कशी मांजराची फजिती करत आहे. तो त्याला स्वतःच्या मागे पळवाट आहे अगदी जेरी जसा टॉमला पळवतो तसं. व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मांजर उंदराला घाबरून सैर वैर धावत आहे, नंतर तुम्ही पाहू शकता की, ती एका कचऱ्याच्या डब्ब्याच्या मागे जाऊन लपते. आणि मग उंदीर तेथून पळायचा प्रयत्न करी लागतो.
पण नंतर मांजर त्याच्या पाठी लागते. मग पुन्हा नंतर उंदीर मांजराला पळवतो. अशी मज्जा या व्हिडीओमध्ये घडते, आणि हे बघून टॉम एंड जेरीच डोळ्यासमोर येत आहेत. हा व्हिडिओ खूपच मजेदार आहे म्हणूनच तो सोशल मीडियावर खूप वायरल होतोय.
खऱ्या आयुष्यातल्या या टॉम अँड जेरी ने लोकांना खूप हसवले आहे, त्यांचे खूप मनोरंजन केलेले आहे. म्हणूनच हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वायरल होत आहे आणि खूप शेयर केला जात आहे. आतापर्यंत या मजेदार व्हिडिओला हजारो लाईक मिळालेल्या आहेत.
तसेच कमेंट मार्फत सुद्धा लोकांनी खूप त्यांच्या भावना व्यक्त व कौतुकही केलेले आहे. एका व्यक्तीने तर कमेंट मध्ये लिहिले की, ” ह्यांना बघून मला टॉम एंड जेरी कार्टूनची आठवण आली”. तर एकाने सरळ लिहिले की , “खऱ्या आयुष्यातले टॉम आणि जेरी”.