पत्नी पीडीत नवरा पोचला पोलीस स्टेशन मध्ये आणि ढसाढसा रडून सांगितलं मला माझ्या बायकोपासून…..

। नमस्कार ।

 नवरा-बायकोमधील भांडणं तशी काही नवीन नाहीत. अनेकदा हे वाद टोकाला जातो. नवरा बायकोचा छळ करत असल्याची अनेक प्रकरणं समोर येत असतात. अशा किती तरी पती पीडित स्त्रिया आहेत. पण आता एका पत्नी पीडित नवऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो विडिओ मध्ये सांगत आहे की , मला माझ्या बायकोपासून वाचवा असं सांगत, ढसाढसा रडत न्याय मागतो आहे.

उत्तर प्रदेश राज्याच्या ललितपूर गावामधील ही घटना आहे. भदैयापुरातील हा रहिवाशी आहे. ब्रजेश कुशवाहा असं या व्यक्तीचं नाव आहे.

पत्नी पीडित हा व्यक्ती न्यायासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली. त्याने आपल्या बायकोवर मारहाणीचा आणि आपल्याला खोट्या आरोपात अडकवल्याची तक्रार त्याने त्या पोलीस स्थानकात केली आहे.

व्हिडीओत ऐकू शकता, ही व्यक्ती आपली बायको आपल्याला खायला देत नाही, खूप मारते, पोलिसांकडून मार खायला लावते. कमाईचे सर्व पैसे हिसकावून घेते. अशी तक्रार करताना दिसतो. रडत रडत तो आपली व्यथा मांडताना दिसतो आहे. आपल्याला न्याय हवा आहे, नाहीतर आपण अशा अत्याचाराने आपल्याला मरण येईल, असंही तो सांगताना दिसतो आहे.

बायकोच्या छळाला वैतागलेल्या या नवऱ्याचा व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहे. बघा विडिओ इथे :

सोर्स :- लोकमत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *