नशीब म्हणावं की चमत्कार , एक नाही तर दोन दोन गाड्यांच्या समोर येऊनही बचावला चिमुकला , बघा व्हिडिओ

l नमस्कार l

एखाद्या भरधाव वेगात असलेल्या गाडीने चांगलीच धडक दिली तर काय होऊ शकतं, याची कल्पना तुम्हाला असूच शकते. असं खरंच घडत असताना एकाच वेळी लागोपाठ एक नाही तर दोन वेळा अपघात झाला तर त्या व्यक्तीचं वाचणं मुष्कीलच नाही तर अशक्यच.

पण एका लहान मुलाच्या बाबतीत मात्र हा मोठा दैवी चमत्कारच घडून आला आहे. आधी तो एका मोटरसायकल ला धडकला, त्यानंतर मागून अजून येत असलेल्या एका भरधाव बससमोर आला. तरी हा मुलगा थोडक्यात वाचला आहे. त्याला साधं कुठे खरचटलंही नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या अ’पघाताचं हे भ’यानक दृश्य तेथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.  व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक एक गाडी जाईल एवढा रस्ता दिसतो आहे.

त्या रस्त्यावरून एक बाईकवाला समोरून येत असल्याचे दिसत आहे. इतक्या रस्त्याच्या एका बाजूने एक मुलगा सायकलवरून येतो आणि धाडकन येत असलेल्या बाईकला जोरात धडकतो. यामुळे तो बाईकस्वार तर स्वतःच नियंत्रण गमावत नाही आणि तो तसाच पुढे निघून जातो. पण सायकल हवेत उडते आणि त्यावरील मुलगा पडतो.

इतक्यात मागून लगेच भरधाव वेगात बस येते. सर्वकाही इतक्या जलद होतं की बाईकस्वार आणि त्या बस ड्रायव्हरलाही ब्रेक मारायला क्षणाचाही वेळ मिळत नाही. सायकल तिथेच रस्त्यावर पडते आणि त्या बसखाली येऊन ती बस त्या सायकल ला चिरडून पुढे जाते.

सुदैवाने मुलगा या सायकलबरोबर नसतो. जेव्हा बाईकला धडकून सायकल हवेत उडते तेव्हा सायकल तिथेच रस्त्यावर पडते पण सायकल चालवत असलेला मुलगा उडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडतो. त्यामुळे त्याचा जीव वाचतो. मुलगा स्वतःच उठून उभा राहिलेलाही दिसत आहे.


व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला हा एखाद्या फिल्ममधील सीन वाटेल. पण ही प्रत्यक्षात घडलेली घटना आहे. केरळच्या कन्नूरमधील तालीपरम्बाजवळी चोरुकलामध्ये हा अपघात झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *