नशीब बलवत्तर म्हणून वाचला या बाईक चालकाचा जीव , ट्रॅक्टरखाली येऊन सुद्धा कसा वाचला जीव पहा , बघा विडिओ

। नमस्कार ।

कधी कधी कुठे ना कुठे अशा घटना घडत असतात की त्याची वैज्ञानिक कारणं शोधणंही खूप कठीण जात असतं. डोक्यावरून ट्रॅक्टरचं अख्खं चाक डोक्यावरून जाऊनदेखील एक व्यक्ती सहीसलामत बचावल्याची घटना नूकतीच समोर आली आहे.या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

असा झाला अपघात :-  ही घटना आहे गुजरातमधल्या दाहोदमधील आहे. पावसामुळे रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं आहे. एकीकडे खड्डे आणि दूसरीकडे पावसामुळे साचलेल्या पाण्यामुळे अशा दुहेरी आव्हानांचा सामना करत एक दुचाकीस्वार एक महिला आणि छोट्या बाळाला घेऊन दूचाकीवरून चालला होता.

त्याच्या डाव्या बाजुने एक ट्रॅक्टर जात होते,तर उजव्या बाजूला पावसाचं पाणी साचलेल होतं. या दोन्हीच्या मधुन बाईक नेत असताना अचानक गाडी स्लिप झाली. आणि तो बाईकस्वार खाली रस्त्यावर पडला आणि त्याच्या डोक्यावरून ट्रॅक्टरचं मागच अख्खं चाक जाऊनदेखील एक व्यक्ती सहीसलामत बचावल्याची घटना नुकतीच गुजरातमधुन समोर आली आहे.

तिघेही थेट ट्रॅक्टरखाली :- गाडी घसरल्यानंतर तिघेही रस्त्यावर पडले आणि ट्रॅक्टरखाली मिळाले. हा अपघात घडला तेव्हा ट्रॅक्टरचा पुढचा भाग पास झाला होता. त्यामुळे मागे काय घडतंय याची ड्रायव्हरला काहीच कल्पना नव्हती.

ट्रॅक्टरच्या मागच्या चाकापाशी आल्यानंतर गाडी घसरली आणि गाडीचालक,महिला आणि लहान बाळ तिघेही ट्रॅक्टरखाली पडले. मात्र त्याचवेळी पडता पडता ही गाडी फिरल्यामुळे महिला आणि बाळ हे ट्रॅक्टरपासुन काहीसे दुर ओढले गेले. त्याच्या अंगावर ट्रॅक्टरचे चाक आले नाही.

यात मात्र ट्रॅक्टरच्या जवळ असणाऱ्या बाईकस्वाराच्या  डोक्यावरून आणि मानेवरून ट्रॅक्टरचं मागचं चाक गेलं.जेव्हा ट्रॅक्टरचं चाक गाडी चालकांच्या डोक्यावरून जातं,त्यावेळी आता त्याचा मृत्यू निश्चित झाला असावा,असंच सुरुवातीला वाटतं. मात्र हा चमत्कार म्हणायचा की नशीब, असा प्रश्न त्यानंतरची दृश्यं पाहिल्यावर पडतो.

डोक्यावरून बाईकचं चाक जाऊनदेखील हा दुचाकीस्वार उठुन उभा राहिला आणि त्यानंतर महिला ट्रॅक्टरचालकाला जाब विचारण्यासाठी पुढं आल्याचं निदर्शनास आलं. अर्थात, या दुचाकीस्वारानं हेल्मेट घातलं होतं. मात्र ट्रॅक्टरखाली पडल्यामुळे हे हेल्मेट त्याच्या डोक्यातुन निघाल्याचंही व्हिडिओत दिसतं. त्यामुळे हेल्मेट नसतानाही डोक्यावरून ट्रॅक्टरचं चाक जाऊन हा माणुस कसा वाचला , असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.सध्या या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

बघा विडिओ :- 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *