नदीच्या काठी बिबट्याने केला अजगरावर हल्ला , शिकार होणार समजताच अजगराने बिबट्यावर केला हल्ला , लढाईचा थरारक विडिओ वायरल

। नमस्कार ।

  सिंह असो , बिबट्या असो , वाघ असो वा साप असो, हे प्रत्येक वेळी स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी , आपली भूक भागवण्यासाठी इतर प्राण्यांची शिकार करून जगत असतात. यात चपळ बिबट्या बद्दल जर बोलायचं झालं तर या बिबट्याला आदिवासी शिकारी म्हणून देखील ओळखलं जातं.

स्वतःचा जीव जगवण्यासाठी आणि आपली हुकूमत कायम ठेवण्यासाठी एक प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार करतो. मात्र, कधीतरीच तुमच्या असं दृष्टीस आलं असेल की एखादा बिबट्या सापासोबतच भिडला. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ वायरल झाला आहे. यात एक बिबट्या अजगरावर हल्ला करताना दिसत आहे.

हा व्हिडिओ बघून सर्वच जण चकित झाले आहेत. असं बोललं जातं की बिबट्या हा एक असा शिकारी प्राणी आहे, जो अतिशय चपळाईने आणि खूप होशियारीने आपली शिकारी करत असतो. तर दुसरीकडे अजगरानेही जर एकदा का आपल्या शिकारीवर हमला केला तर समोरच्या प्राण्याचं वाचणं अशक्यच होऊन जातं.

अशात तुम्ही याची कल्पना करू शकता का की या अशा भयंकर लढाईमध्ये कोणाचा जय होईल आणि कोणाचा पराजय ? या वायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकाल की एक बिबट्या पिण्याचे पाणी पिण्यासाठी नदीच्या काठावर जात असतो. तिथे त्याची नजर जवळच असलेल्या एका छोट्या अजगरावर पडते. अशात बिबट्या क्षणाचाही विलंब न करता संधी मिळताच लगेचच अजगरावर हल्ला करतो आणि त्या अजगराच्या आपल्या जबड्यात पकडतो.

यादरम्यान अजगरही स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याच्यावर सुद्धा हल्ला करतो पण बिबट्या या परिस्थितीमध्ये योग्य प्रकारे पकडतो आणि अजगराची शिकार करतो. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर wild_animals_creation नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे.

एका यूजरने यावर प्रतिक्रिया देत लिहिलं, हा व्हिडिओ पाहिल्यावर समजलं की बिबट्याला जंगलातील सर्वात जास्त  घातक शिकारी म्हटलं जातं. तर दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, जंगलात कधी काय होईल, हे कोणालाही सांगता येत नाही. अजगर हा विषारी नसतो पण ते आपल्या शिकाऱ्याला सहज सोडतही नाहीत.

अजगराच्या तावडीत कोणी सापडलं तर जोपर्यंत त्या प्राण्याचा जीव जात नाही तोपर्यंत अजगर त्याचा गळा आवळून ठेवतो. अजगर बिबट्यासाठीही घातक ठरला असता. मात्र या व्हिडिओमध्ये बिबट्याने अजगरासोबतची लढाई जिंकून त्याचा जीवही घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *