। नमस्कार ।
झारखंडमधील गिरिडिह जिल्ह्यातून सोमवारी एक मोठी दुर्घटना झाली आहे. शहरातील सिरसियामध्ये सकाळी PDS (जनवितरण प्रणाली) योजनेसाठी तांदूळ घेऊन जाणाऱ्या ट्रकने ट्यूशनसाठी सायकलवरुन जाणाऱ्या एका विद्यार्थ्यांच्या अंगावरुन गाडी गेली. या अपघातात 18 वर्षांच्या या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे.
ट्रकने या विद्यार्थ्याला मागून धडक दिली. ज्यामुळे तो ट्रकच्या चाकाखाली आला आणि ट्रक त्याच्या अंगावरुन गेला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, कशा प्रकारे सायकलवरुन विद्यार्थी जात होता आणि मागून येणाऱ्या ट्रकने त्याला धडक दिली यात तो सायकलवरून खाली कोसळला आणि दुर्दैवाने ट्कच्या चाकाखाली आला.
मिळालेल्या माहितीनुसार, 18 वर्षीय उज्ज्वल कुमार राय आपलं घर सिरसिया येथून ट्यूशनसाठी शहराच्या दिशेने जात होता. त्याच दिशेने पीडीएस तांदूळ लोड करून येणारा ट्रक गिरिडिहच्या दिशेने जात होता. ट्रकने उज्ज्वला मागून धडक देत त्याच्या अंगावरून गाडी नेली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.
उज्ज्वलच्या कुटुंबीयांनी त्याचा मृतदेह उचलण्यास नकार दिला. यानंतर पोलीसही घटनास्थळी हजर झाले. प्रशासनाने घटनास्थळावरुन ट्रक जप्त केला आहे. आणि या प्रकरणात तपास सुरू आहे. पोलिसांनी सांगितलं की, ज्या ट्रकने धडक दिली होती, त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.
अपघातात मृत्यू झाल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनाही समजावण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र कुटुंबीयांनी हा अपघात नसून हत्या असल्याचं सांगितलं. त्यामुळे ड्रायव्हरसह ट्रक मालकावर हत्येचा गुन्हा दाखल व्हायला हवा. आणि नुकसानभरपाई देखील द्यावी. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ज्यामध्ये दिसत आहे की, विद्यार्थी एका बाजून जात होता आणि तेवढ्यात ट्रक त्याच्या मागून आला.
बघा विडिओ :