धक्कादायक ! तुम्हीही सेल्फी काढत असाल तर सावधान, पहा या जोडप्यासोबत घडलेली घटना बघून तुम्ही कधीच काढणार नाही सेल्फी….

। नमस्कार ।

दु’र्घटना कधीही आणि कोणासोबतही घडू शकते. कधी , कुठे , कस कोणासोबत काय घडेल या बद्दल कोणीच सांगू शकत नाही आणि विचारही करू शकत नाही. त्यातच कोणाच्या जीवाला धोका असेल तर त्या मृत्यूबाबत तर कोणालाच अंदाज लागत नाही.

मात्र, अनेकदा मृत्यू कॅमेऱ्यात कैद होतो. असंच काहीसं घडलं, स्कॉटलँडमध्ये फिरायला गेलेल्या सोफी पास आणि पती रिचर्डसोबत. दोघंही पावसाळ्यात स्कॉटलँडमध्ये फिरायला गेले होते. यादरम्यान अचानक त्यांच्या सेल्फीमध्ये असं काही कैद झालं, ज्याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती.

सोफी आणि तिचा पती रिचर्ड हे विकेण्डला लोच्स ऑफ नॉर्थ स्कॉटलँड येथे गेले होते. यादरम्यान तिथे पाऊस सुरू होता. दोघांनीही नदीच्या समोर सेल्फी घेण्याचा निर्णय घेतला.

मात्र, सेल्फी क्लिक करतानाच या दोघांनाही या गोष्टीची जाणीव झाली की काहीतरी होणार आहे. सेल्फीमध्ये दिसतं की सोफीचे केस इलेक्ट्रोमॅगनेटमुळे वरती उभे होऊ लागले. हे पाहताच रिचर्डला धो’का समजला. यानंतर त्या दोघांनीही तिथून काढता पाय घेतला.

सोफी आणि रिचर्डच्या या सेल्फीनं सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. त्यावेळी स्कॉटलँडमध्ये मुसळधार पाऊस सुरू होता. मात्र, तरीही कपलनं त्याठिकाणी जाऊन सुट्टी इन्जॉय करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सेल्फी घेत असतानाच रिचर्डला दिसलं, की सोफीचे केस वरती उभा राहत आहेत. त्यानं लगेचच आपल्या पत्नीचा हात पकडला आणि तो आपल्या कारच्या दिशेनं धावू लागला. कपलनं ज्याठिकाणी सेल्फी घेतला होता, तिथे काहीच वेळात वीज कोसळली.

या घटनेबाबत बोलताना सोफीनं सांगितलं, की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं ही ट्रीप इन्जॉय केली. पाणी शांत होतं आणि हवादेखील थंड होती. मात्र, त्यांनी विजेच्या बाबत विचारच केला नव्हता.

पावसात अनेकदा लोक विजेकडे दुर्लक्ष करतात. या कपलनंदेखील हीच चूक केली. दोघंही आरामात सेल्फी घेत होते. मात्र, पावसात अशा पद्धतीनं फिरणं घातक ठरू शकतं. परंतु, सेल्फीमुळे या कपलला येणाऱ्या धोक्याची आधीच कल्पना आली आणि दोघांचाही जीव वाचला. मित्रांनो तुम्ही सुद्धा सेल्फी , फोटो काढताना जर सांभाळून , काळजी घेऊन काढा.

Leave a Reply

Your email address will not be published.