। नमस्कार ।
निवडक काही मराठी चित्रपट , त्या चित्रपटा मधील गाणी आणि चित्रपटातलेसर्व कलाकारांचा अभिनय मनात जागा निर्माण करतात. तसाच एक मराठी चित्रपट म्हणजेच ‘दे धक्का’. या चित्रपटातील सर्वच कलाकारांनी केलेला अभिनय लोकांना खूप आवडला आहे. त्यामुळे लोकांनी या चित्रपटाला भरपूर पसंती दर्शवली होती. 2008 साली हा चित्रपट महाराष्ट्रात सुपरहिट ठरला होता. चित्रपटातील बालकलाकारांचा अभिनय सुद्धा खूप उत्तम होता.
‘दे धक्का’ चित्रपटात मकरंद अनासपुरे यांचा गावाकडील अंदाज, सिद्दार्थ जाधवचा अतरंगी बाज प्रेक्षकांना तर खूपच आवडला. शिवाजी साटम, मेधा मांजरेकर याच्याही भूमिका उल्लेखनीय होत्या. सक्षम कुलकर्णी आणि गौरी वैद्य या बालकलाकारंनी तर त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले.
‘दे धक्का’ या चित्रपटातील हे छोटे कलाकर आता मोठे झाले आहेत. पहिल्यापेक्षा त्यांच्या दिसण्यात खूप बदलही जाणवतो. गौरी वैद्य हिने चित्रपटात सायली पात्राची ही भूमिका साकारली होती. ‘दे धक्का’ चित्रपटाची कथा सायलीच्या नृत्य स्पर्धेवर आधारीत आहे. गौरीनं ती भूमिका खूप उत्तमरित्या साकारली. उगवली शुक्राची चांदणी या गाण्यावर सायली नाच करताना दिसली. हे गाणं प्रचंड सुपरहिट झालं. याच गाण्यामुळे गौरीला लोकप्रियता मिळाली.
‘दे धक्का’ च्या अपार यशानंतर गौरीनं ‘शिक्षणाच्या आयचा घो’ या चित्रपटात देखील काम केलं. त्याचबरोबर तिनं 2011 ला ‘एकापोक्षा एक जोडीचा मामला’ या रिअॅलिटी शो मध्ये सहभाग घेतला होता. 2015 साली तिनं ‘आवाहन’ चित्रपटात काम केलं.
गौरीने आता आपल्या शिक्षणावरती जास्त लक्ष केंद्रित केले आहे. गौरी आता मोठी म्हणजे पंचवीस वर्षाची झाली आहे. तिने मुंबईमध्ये ‘डि. जी. रुपारेल महाविद्यालय’ यामधून शिक्षण घेतल्यानंतर तिने इंजीनियरिंग अँड कॉम्प्युटर टेक्नोलॉजी मधून पदवी घेऊन शिक्षण पूर्ण केले. गौरीला पुन्हा अभिनय क्षेत्रात काम करताना पाहायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. त्याचप्रमाणे पुढे गौरी कोणत्या चित्रपटात पाहायला मिळेल याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता आहे.